पो.नि.दौलतराव जाधव व पुढारी बाळासाहेब गिरमकर यांच्या कट कारस्थानांमुळे बेकायदेशीर जमावाने घर आणि गोठा पेटवल्याबाबत पीडितांचे वरिष्ठांना निवेदन सादर..

दिनांक २ जून(अजनूज,श्रीगोंदा):

तालुक्यातील अजनुज येथील शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी त्याचे घर पेटवले, या प्रकरणी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व बाळसाहेब गिरमकर यांनी कट करून घटना घडवल्याचा आरोप करत,शेतक-याने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या घटनेने या पीडित शेतक-याचे कुटुंब उघड्यावर आले आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज गावातील गट नं.२४५ मध्ये पांडुरंग अंबादास मालुसरे हे छपराच्या घरात कुटुंबासह राहत होते व शेजारीच गुरांचा गोठा होता. सदर घर व गुरांचा गोठा दिनांक १ जून रोजी गिरमकर यांची एक महिला, रावसाहेब गिरमकर व इतर चाळीस ते पन्नास लोकाच्या जमावाने जमिनीचा ताबा घेण्याच्या उद्देशाने पोलीसांनी फिर्यादिस व कुटुंबातील व्यक्तींना पोलीस स्टेशनला घेवून गेल्यावर मागे पेटवले. असल्याचा आरोप पीडितांनी पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी पांडुरंग अंबादास मालुसरे हे गट नं. २४५ मध्ये राहत असून, त्यांचे इतर तीन भाऊ हे बारामती येथे राहत आहेत. अंबादास मालुसरे व त्याचे भावांमध्ये काही दिवसांपूर्वी जमिनीवरून वाद झाल्याने, अंबादास मालुसरे यांनी श्रीगोंदा कोर्टात वाटपासाठी दावा दाखल केलेला आहे. सध्या लॉकडाऊन असलेमुळे कोर्ट बंद असल्याचा गैरफायदा घेवून, कोर्टात दावा प्रलंबित असतांनाही, फिर्यादीचे बारामती येथे असणारे भाऊ बाळू व शिवाजी यांनी सदर गट नं. २४५ मधील क्षेत्र फिर्यादीचा हिस्सा डावलण्यासाठी बेकायदेशीर खरेदिखताने दिनांक ११ फेब्रुवारी २०२० रोजी मीराबाई गिरमकर व दत्तात्रय अर्जुन सूर्यवंशीनी विक्री केले. सदर जमिनीचा ताबा मात्र, फिर्यादी पांडुरंग मालुसरे यांचा होता व त्यातच त्यांचे घर होते.

त्यांनतर सदर जमिनीचा ताबा घेनेसाठी राजकीय नेते बाळासाहेब गिरमकर प्रयत्न करत होते. त्यांनी व आरोपींनी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचेबरोबर हातमिळवणी करून, दिनांक २० मे २०२० रोजी त्या जामिनीचा ताबा घेणेसाठी प्रकरण कोर्टात प्रलंबित असताना, आरोपी बरोबर पोलीस पाठवले. पोलिसांनी फिर्यादीवर घर जमीन खाली करणेसाठी दमबाजी, अरेरावी केली. त्याचे मोबाईल वर फिर्यादीचे घरातील लोकांनी व्हिडीओ शुटींग केले. ताबा न मिळाल्याने पोलीस निघून गेले. या घटनेबाबत मालुसरे यांनी निवेदनात नमूद आहे.

याप्रकरणी सदर पोलिसांची व इतर व्यक्तीबाबत पांडुरंग मालुसरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. ताबा घेवू पाहणा-या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांचेकडे परवानगी मागितली. त्यानंतर दौलतराव जाधव व बाळासाहेब गिरमकर यांनी फिर्यादी व त्याचे मुलास पोलीस स्टेशनला चौकशीच्या नावाखाली बोलवून दमदाटी करून, पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीतून दोन्ही पोलिसांचे व बाळासाहेब गिरमकर याचे नाव कमी करणेसाठी दबाव आणून, जवाब घेण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादी चे मत आहे.

त्यावेळी पांडुरंग मालुसरेंचे बारामतीचे भाऊ देखील पोलीस स्टेशनला जिल्हाबंदीचा आदेश मोडून उपस्थित झाले. त्याच काळात फिर्यादीच्या क्षेत्राचा ताबा घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न करत असतानाचे शुटींग घेतलेले मोबाईल चोरीचा प्रयत्न झाला. या दोन्ही घटनाबाबत फिर्यादीने वरिष्टानां कळवून पोलीस निरीक्षक जाधव व बाळासाहेब गिरमकर यांचेपासून संरक्षण मिळण्याची मागणी केली होती. पोलीस निरीक्षक व त्यांचे पोलीस बेकायदेशीर ताबा घेत असलेने फिर्यादीने वरिष्ठांना त्याबाबत कोर्टात दाद मागणार असलेबाबत नोटीसही वकिलांमार्फत पाठवली.

फिर्यादी जमिनीचा ताबा सोडत नाहीत. हे पाहून त्यांना घटनेच्या आदल्या दिवशी दिनांक ३१ मे २० रोजी त्यांचे घर पेटवणार असलेची धमकी आरोपींनी दिल्याबाबत फिर्यादीने पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस उपधिक्षक व पोलीस अधीक्षकांना स्वता जावून लेखी कळवूनही, त्यांनी त्याची दखल घेतली नाही. असे पांडुरंग मालुसरे यांनी दिलेल्या माहिती नुसार समजते आहे.

काल दिनांक ०१ जून २०२० रोजी फिर्यादीचे बारामतीचे भाऊ जिल्हाबंदीचा आदेश डावलून बेकायदेशीर पणे फिर्यादीचे शेतात खरेदीदार, रावसाहेब गिरमकर व इतर चाळीस पन्नास लोकाचा जमाव काठ्या, कु-हाडी घेवून ट्रक्टर घेवून आले. ताबा देण्याबाबत फिर्यादी व कुटुंबाशी हुज्जत घातली. त्यावेळी पोलिस गाडी तेथे आली व त्यांनी फिर्यादी व त्याचे घरातील व्यक्तींना पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले. परंतु, आरोपींना तेथेच थांबले. फिर्यादी त्याचे घरातील व्यक्ती पोलीस स्टेशनला निघाल्यावर मागे गिरमकरांची एक महिला, रावसाहेब गिरमकर, भाऊसाहेब गिरमकर, विमल गिरमकर व ४० ते ५० लोकांच्या जमावाने फिर्यादीचे घर पेटवून दिले. त्यावेळी लोकांनी घर विजविण्याचा प्रयत्न केला. परंतु, घरातील सर्व जीवनावश्यक सामान, धान्य, भांडी असे सुमारे एक लाख रुपयाचे साहित्य जळून गेले आहे.

पोलीस निरीक्षक यांनीच आरोपींशी कट करून फिर्यादिनां पोलीस स्टेशनला बोलवून, मागे घर पेटवण्यास आरोपींना मोकळे सोडले. तसेच, पोलीस अधीक्षकांना वरीष्टानां वारंवार कळवूनही याबाबत त्यांनी पोलीस निरीक्षक जाधव यांचेवर काहीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदन फिर्यादी तशेच घटनेतील पीडितांनी दिले आहे.

पोलिसांमार्फत अश्या अनेक लीला खुलेआम चालू असल्याचे निदर्शनास येत आहेत. त्यापैकी दिनांक १ जून रोजी पोलीसांनी ५७०००/- रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करून, उमेश वेताळ हे तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. काही दिवसांपूर्वीच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी राजकीय पुढारी व पोलीस निरीक्षक यांच्यातील वाद मिटवण्यासाठी बैठक घेवून, पोलीस नाईक पितळे यांची बदली केली होती. या प्रकरणाबाबत पोलीस अधिकारी संजय सातव कुठे कुठे बैठक घेतात ? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading