श्रीगोंद्यात होणार विचारांचा जागर; १५ ते २३ एप्रिल दरम्यान ‘महामानव विचार प्रबोधन’ व्याख्यानमालेचे आयोजन..

दिनांक १३ एप्रिल २०२६ श्रीगोंदा:

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांच्या संयुक्त जयंती उत्सवाचे औचित्य साधून श्रीगोंदा शहरात ‘महामानव विचार प्रबोधन यात्रा – २०२६’ अंतर्गत जाहीर व्याख्यान सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार, १५ एप्रिल ते गुरुवार, २३ एप्रिल २०२६ या कालावधीत सायंकाळी ६.३० वाजता संत शेख महंमद महाराज पटांगणावर ही व्याख्यानमाला रंगणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन सावित्री-फातिमा सद्भावना विचारमंच, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, महात्मा फुले समता परिषद, सत्यशोधक समाज पक्ष यांसह विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

व्याख्यानमालेचे सविस्तर नियोजन:

बुधवार, १५ एप्रिल २०२६

व्याख्याते: मा. दिपक केदार साहेब (राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना) अध्यक्ष: सौ. अनुराधा नागवडे (संचालिका, जिल्हा सहकारी बँक, अ.नगर).. प्रमुख पाहुणे: मा. श्रीमती सुनिता खेतमाळीस (नगराध्यक्षा, श्रीगोंदा), सौ. हिराबाई गोरखे (अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त).

मंगळवार, २१ एप्रिल २०२६

व्याख्याते: मा. अजिंक्य चांदणे साहेब (प्रदेशाध्यक्ष, डेमॉक्रॉटीक पार्टी ऑफ इंडिया).. अध्यक्ष: श्री. विठ्ठलराव वाडगे साहेब (संस्थापक-अध्यक्ष, वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट संस्था).. प्रमुख पाहुणे: डॉ. सौ. प्रतिभाताई पाचपुते (अध्यक्षा, परिक्रमा शैक्षणिक संकुल), सौ. अनुराधा ठवाळ (माजी पं. स. सदस्या).

गुरुवार, २३ एप्रिल २०२६

व्याख्याते: मा. प्रा. सुकुमार कांबळे साहेब (संस्थापक अध्यक्ष, डेमॉक्रॉटीक पार्टी ऑफ इंडिया).. अध्यक्ष: डॉ. रफिक सय्यद साहेब (प्रबोधनकार, पारनेर).. प्रमुख पाहुणे: डॉ. सौ. प्रणोती जगताप, सौ. शुभांगी पोटे (माजी नगराध्यक्षा, श्रीगोंदा). हे असणार आहेत.

या प्रबोधन यात्रेसाठी भारतीय बौद्ध महासभा, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, प्रहार संघटना आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना यांसह अनेक स्थानिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या वैचारिक प्रबोधनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रसिद्धी प्रमुख: निर्भीड कलम..

Leave a Reply