नगरपालिका ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दुर्घटना.. लेंडी नाल्यात सेफ्टी टँकमध्ये पडून बाळु घोडकेंच्या म्हैशीचा मृत्यु..!

दिनांक २१ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा नगर पालिका प्रशासनाचे विकास कामांत ठेकेदारांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे सिद्धार्थ नगर येथील रहिवाशी बाळु गणपत घोडके यांच्या दुभत्या जनावराचा जीव गेला आहे. लेंडी नाला परीसरात नाल्याच्या पात्रातील हिरवळीत चरत असलेल्या म्हशीचा येथील उघड्या सेफ्टी टँकमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक १८ फेब्रुवारी रोजी घडली आहे. यामुळे सदरील पिडित घोडके यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेतून माझे नुकसान झाले आहे. मात्र, लेंडी नाला पात्रात श्रीगोंदा शहरातील सोडण्यात आलेल्या सांडपाणी आणि मैला ज्या टँकमध्ये सोडण्यात आला आहे. त्यातील एकाचे झाकण उघडे असल्याने त्यात लहान मुलांसह वृद्ध व्यक्ती किंवा पुन्हा मुके जनावर पडून दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नगरपालिका विकास कामांत ठेकेदारांचा हलगर्जीपना निष्पापाच्या जिविताच्या दुर्घटनेला जबाबदार ठरू शकतो. त्यामुळे ठेकेदार व श्रीगोंदा नगर पालिका प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालून सदरील ठेकेदाराला सूचना कराव्यात.. अश्या मागणीचे प्रसिध्दी पत्र घोडके यांनी माध्यमांना दिले आहे.

दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ३:०० वाजनेच्या दरम्यान शहराच्या सांडपाण्याची आणि परिसरातील नागरिकांच्या मैला विसर्जनासाठी बनवलेल्या शोष खड्यात साठलेल्या पाण्यात बाळु घोडके यांची म्हैस बुडाली याचे आसपास असलेले नागरीक साक्षीदार आहेत. नमूद मयत म्हैशीचा मृतदेह JCB च्या सहाय्याने या टाकीतून काढण्यात आला.

लेंडी नाला सुशोभीकरण कामासाठी काष्टी येथील ठेकेदार वैभव माने हे काम पाहत आहेत. त्यांनी या नाल्याला तटरक्षक भिंतीही बांधलेल्या नाहीत. त्यामुळे जनावर नाल्याच्या पात्रातील गवत खाण्यासाठी याठिकाणी घुसतात. त्यातच बांधलेल्या टाकिंवर सिमेंटची झाकनं टाकलेली नसल्याने, यातील पाणी पिण्यास आलेली जनावरं ही टाकीत पडून गुदमरून मृत्यू पावत असल्याचे या घटनेवरून समोरं आले आहे. तर, भिंत बांधून सेफ्टी टँकवर तत्काळ झाकण टाकावे.. जेणेकरून पुन्हा अशी परिस्थिती उद्भवणार नाही. अन्यथा पालिका ठेकेदाराचा बेजबाबदारपना लहान मुलं, वयोवृद्ध व्यक्तीच्या जीवावर बेतण्यास वेळ लागणार नाही.. असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पिडीताने नमूद केले आहे.

स्रोत:(प्रसिध्दी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading