खासदार म्हणून डॉ.सुजय विखे अपयशी ठरलेत.. भरीव काम कुठेच दिसत नाही..!: घनःश्याम शेलार..

दिनांक २१ फेब्रुवारी २०२४,श्रीगोंदा:

खासदार म्हणून डॉ.सुजय विखे दक्षिण मतदार संघ आणि श्रीगोंदा तालुक्यातील प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेत..! अशी टीका बीआरएस नेते घनशाम शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

शेलार म्हणाले सोमवारी सुजय विखे श्रीगोंदा तालुका दौऱ्यावर आले असता साकळाई उपसा सिंचन योजना, डिंभे बोगदा पूर्ण करणार, एमआयडीसी केली खासदार म्हणून जो शब्द दिला.. तो कोणता पूर्ण केला नाही. असा सवाल करत विरोधकांना पोटदुखी झाल्याची टीका केली. वास्तविक विखे यांनी ५ वर्षे निष्क्रियता दाखवली. मागील निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे यांच्या प्रचारात जनतेला “तुम्ही विखे यांना विजयी करा.. मी साकळाई उपसा सिंचन योजना करून श्रीगोंदा नगर तालुक्यातील गावांना पाणी देतो”..! असे आश्वासन दिले होते.

येथील जनतेने विजयी केले.. पुढे देवेंद्र फडणवीस ६ महिने मुख्यमंत्री होते. तर, राधाकृष्ण विखे मंत्री होते. पण, साकळाई उपसा सिंचन योजना धूळखात पडली. आत्ता आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्यांना आठवण झाली. मग हा चूनावी जुमला नाही का..? असा सवाल करून शेलार म्हणाले, एमआयडीसी बाबत देखील शंका आहे. कारण एमआयडीसीसाठी किमान ७५० एकर क्षेत्राची गरज असते. त्यापेक्षा कमी क्षेत्र असेल.. तर, मिनी एमआयडीसी मंजूर होते. सद्याचे प्रस्तावित क्षेत्र ६१८ एकर आहे.

खा.विखे यांनी पुणे जिल्हा पाण्याबाबत अन्याय करतो. त्यावर तोडगा म्हणून, अधीक्षक अभियंता कार्यालय नगरला सुरू करणार. असे आश्वासन दिले होते. जनता पाण्याचा प्रश्न सुटेल.. म्हणून, विखे यांना विजयी केले. पण, ते कार्यालय नगरला सुरू करणे सोडा.. खासदार कालवा सल्लागार समितीचे सदस्य असताना ते किती बैठकीला हजर राहिले..? याचे उत्तर द्यावे.. केवळ त्यांच्या निष्क्रियतेमुळे दरवर्षी श्रीगोंद्याला पाणी कमी मिळाले.

रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलाचे काम न केल्याने दौंड – नगर राजमार्गवरील तासनतास वाहतूक कोंडी होते.,जामखेड – मुंबई मार्गावरील फूट पाथ एक महिन्यात पूर्ण करण्याचा शब्द दिला तो हवेत विरला., नगर एमआयडीसी विकासासाठी मोठे उद्योग आणण्याची घोषणाही अशीच विरली., खासदार दक्षिणेचे पण केंद्रातील बडे नेत्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्तरेत घेण्याचे धोरण यामुळे दक्षिणेचा विकासाचा अनुशेष तसाच राहिला.., याशिवाय नगर जिल्हा विभाजन भिजत घोंगडे केवळ जिल्हा वेगळा झाल्यास लोकसभा निवडणुकीत नगर मतदार संघच दुसऱ्या जिल्ह्यात जाईल.. परिणामी विखे हे पर जिल्ह्यातील उमेदवार ठरतील. या भीतीनेच जिल्हा विभाजन रखडले. असा आरोप करत शेलार यांनी खासदार म्हणून डॉ.सुजय विखे अपयशी ठरले भरीव काम कुठेच दिसत नाही अशी टीका करून, तालुक्यात कुठेही एमआयडीसी करावी मला पोटदुखी नाही. पण, निवडणुकीच्या तोंडावर घोषणा सुरू झाल्याचे मी जनतेला दाखविल्याने तुमची डोकेदुखी वाढली.. हे खरे असल्याचा टोला शेलार यांनी लगावला.

स्रोत:(प्रसिध्दी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading