दिनांक १२ मार्च,श्रीगोंदा:
आज शुक्रवार दिनांक १२ मार्च रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सुरज संजय ससाणे रा.ससाणेनगर, श्रीगोंदा यांचा आकस्मित मृत्यू झाला.

खूप कमी वयात सुरजने आपल्या जीवनाचा प्रवास थांबवून सर्वांना थक्क करून टाकले. सूरजचे वय २६ होते. सूरज श्रीगोंदा नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून, काम करत होता. काही दिवसा पूर्वीच वडिलांच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यात सूरज न डगमगता वडिलांची जागा घेऊन, आपल्या घर कुटुंबीयांची जबाबदारी पार पाडत होता. पण, काळाने परत सुरजच्या घरावर घाव घातला. “म्हणतेत ना जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला” अखेर आज सुरजने उगवता सूर्य न पाहता शेवटचा निरोप घेतला. सुरजच्या मागे त्याची आई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
स्रोत:(संदीप उमाप,श्रीगोंदा)
