दिनांक १२ मार्च,श्रीगोंदा:
खासदार सुजय दादा विखे (पाटील) यांच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यासाठी वीस अत्याधुनिक ॲम्बुलन्स देण्यात आल्या असून, श्रीगोंदा तालुक्यासाठी त्यातील दोन ॲम्बुलन्स देण्यात आल्या आहेत.

त्याचा लोकार्पण सोहळा खासदार सुजय दादा विखे (पाटील) यांच्या संपर्क कार्यालय श्रीगोंदा येथे करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन खामकर, डॉ.टकले डॉ.पाटील, डॉ.कसरे, डॉ.हिरडे व श्रीगोंद्यातील बहुतांश डॉक्टर उपस्थित होते.
श्रीगोंदा नगरपालिकेचे (उपनगराध्यक्ष) रमेश लाढणे, सुभाष डांगे, पोपट खेतमाळीस, अजित जामदार, भाई इनामदार, हरिभाऊ काळे, संजय जगधने, संतोष इथापे, काकासाहेब कदम, अमोल शेलार यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्रोत:(अमोल शेलार,श्रीगोंदा)
