राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग व सर्व पदाधिकऱ्यांच्या वतीने मा. ना. अजित दादा पवार व मा. जयदेव गायकवाड तसेच मा. पंडित कांबळे, मा. अभिजित ससाणे यांचे मनःपूर्वक आभार.

दिनांक ११ मार्च,श्रीगोंदा:

नुकत्याच महाविकास आघाडी सरकारने जाहीर कलेल्या अर्थसंल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री मा. ना. अजित दादा पवार यांनी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मकार महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी महामंडळ व महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यासाठी अर्थसंकल्पात प्रत्येकी १०० कोटी रुपयांची तरतूद केली. याशिवाय क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यातील राष्ट्रीय स्मारकाच्या कामाबाबत बैठक घेऊन ते वेगाने मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचही दादांनी आश्वस्त केलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार हे सर्व समाज घटकाच्या विकासासाठी काम करत आहे. हे स्पष्ट होत आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

वरील महामंडळांच्या निधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे (प्रदेशाध्यक्ष) मा.आ.जयदेव गायकवाड तसेच सामाजिक न्याय विभागाचे (प्रदेश उपाध्यक्ष) मा. पंडित कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे (जिल्हाध्यक्ष) मा. अभिजित ससाणे यांनी विशेष प्रयत्न केले. त्याबद्दल श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे (तालुकाध्यक्ष) संदिप उमाप व सर्व पदाधिकऱ्यांच्या वतीने मा.ना अजित दादा पवार व मा.श्री जयदेव गायकवाड तसेच मा पंडित कांबळे, मा अभिजित ससाणे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

स्रोत:(संदीप उमाप,श्रीगोंदा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading