राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्ष पदी विजय खेतमाळीस.!

दिनांक ११ मार्च,श्रीगोंदा:

अनेक दिवसांपासून श्रीगोंदा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचा तालुकाध्यक्ष कोण होणार ? याबद्दल चर्चा चालू होती. अखेर या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष घन:शाम शेलार व माजी आमदार राहुल जगताप यांच्या पुढाकाराने विजय खेतमाळीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

https://bit.ly/bspmycityshrigonda

त्यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विनोद बोणगे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शुभम बंब, प्रदेश सरचिटणीस सौरभ देशमुख, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, कार्याध्यक्ष विशाल म्हस्के, उपाध्यक्ष प्रसाद कर्णावट, यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

खेतमाळीस हे २०१४ विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मध्ये सक्रिय असून, वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या शाळेपासून विद्यापीठापर्यंतच्या प्रश्नांवर ते आवाज उठवत असतात. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या बरोबर त्यांची वाढत असलेली जवळीकता, तालुक्यातील सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत असलेले संबंध, श्रीगोंदा शहर तसेच तालुक्यात विद्यार्थ्यांचे कुशल संघटन, प्रमुख महाविद्यालयांवर त्यांची असलेली पकड, पाहता खेतमाळीस यांची निवडच निश्चित मानली जात होती.

खेतमाळीस यांनी निवडीनंतर पक्षाचे व नेत्यांचे आभार मानत, येणाऱ्या काळात तालुक्यातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना पोहचवून, तालुक्यातील प्रत्येक महाविद्यालयात सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर्ती अग्रेसर राहून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम केले जाईल. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, प्रदेशउपाध्यक्ष घन:शाम शेलार, माजी आमदार राहुल जगताप, यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून संघटना जिल्यात नंबर एकची करून दाखवेल असे सांगितले.

खेतमाळीस यांच्या निवडीनंतर श्रीगोंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हरिदास शिर्के, युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, सा.न्यायचे तालुकाध्यक्ष संदीप उमाप, सुशीलकुमार शिंदे, माजी तालुकाध्यक्ष नितीन थोरात, यांसह सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.!

यावेळी (कर्जत तालुकाध्यक्ष) स्वप्नील तनपुरे, (कार्याध्यक्ष) गणेश सुद्रीक, (जामखेड तालुकाध्यक्ष) रतन काळे, (शेवगाव तालुकाध्यक्ष) अभिजित आहेर व सर्व जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष उपस्थित होते.!

स्त्रोत:(संदीप उमाप,श्रीगोंदा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading