वैद्यकीय सुविधां अभावी मागासवर्गीय तरुणाचा मृत्यू.. तात्काळ उपकरनं उपलब्ध करावीत..अन्यथा आंदोलनाचा इशारा..

दिनांक १२ मार्च, श्रीगोंदा:

श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात तातडीच्या सोईसुविधा उपलब्ध करून देऊन इतर मागण्या मान्य करण्याबाबत श्रीगोंदा तहसीलदार प्रदीप पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग व शिवसेना, युवासेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केले आहे की, श्रीगोंदा शहरांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या महामारीमुळे व अनेक प्रकारच्या रोगराईमुळे लोकांचा मृत्यू होत आहेत. कित्तेक रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात सोई, सुविधां अभावी मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवतांना दिसत आहेत.

https://bit.ly/bspmycityshrigonda

आज शुक्रवार १२ मार्च रोजी मध्यरात्री १.३० वा. च्या सुमारास नगरपालिका सफाई कामगार सुरज संजय ससाणे रा. ससाणेनगर, श्रीगोंदा यांचा वैद्यकीय (तांत्रिक) सुविधां नसल्यामुळे मृत्यु झाला आहे. जर, ग्रामीण रूग्णालयामध्ये कार्डियाक रुग्णवाहिका असती ? तर, त्या रुग्णाला त्याचा जीव गमवावा लागला नसता. तरी, ग्रामीण रूग्णालयामध्ये कार्डियाक रुग्णवाहिका, आय.सी.यु., लहान मुलांच्या सर्व सोई सुविधा व तज्ञ डॉक्टर २४ तास उपलब्ध करून देण्यात यावेत. तसेच खाजगी हॉस्पिटलमध्येही सेवा देणारे डॉक्टरांनीही रात्री अपरात्री येणाऱ्या रुग्णासाठी सेवा द्यावी. अशी सूचना आपले स्तरावरून करावी असे म्हंटले आहे.

या निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागचे तालुकाध्यक्ष संदिप उमाप व शिवसेना, युवासेना तालुका पदाधिकारी हरिभाऊ काळे यांनी म्हंटले आहे.

स्थानिक प्रशासनास निवेदन सादर करतांना राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागचे कार्याध्यक्ष गोरख घोडके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय खेतमाळीस, युवा नेते शाम भाऊ जरे, काँग्रेसचे पदाधिकारी आदेश शेंडगे, युवासेना शहर प्रमुख ओंकार शिंदे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष आकाश भोसले, सा. न्या. विभागाचे शहर कार्याध्यक्ष जितू पाटोळे, अमित ससाणे तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

स्रोत:(निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading