दिनांक १२ मार्च,श्रीगोंदा:
श्रीगोंदा नगरपरिषदेने घनकचरा प्रकल्प या ठिकाणी मैला प्रकल्प राबवल्याने प्लास्टिक आणि कचरा कंपाउंडवरुन पडून नदी प्रदूषित.

गट क्रमांक १६२९ या ठिकाणी श्रीगोंदा नगरपरिषदेचा घनकचरा व्यवस्थापन डेपो आहे. या डेपोचे क्षेत्रफळ ६० गुंठे असून, त्यामुळे कचऱ्याला जागा नसल्याने तो नदी मध्ये कंपाउंडच्या वरून ओसांडून वाहत आहे. तसेच शहराचा वाढता कचरा या कारणांमुळे नदीमध्ये पडत आहे. स्थानिक ग्रामस्थ, रायकर वस्ती, वडवकर वस्ती, शिंदे वस्ती या परिसरातील नागरिकांना या कचरा डेपोचा गेले वीस वर्षापासून त्रास सहन करवा लागत आहे.
वेळोवेळी आंदोलन, उपोषण, वेळप्रसंगी गेट बंद करणे, नगरपरिषद पुढे कचरा नेऊन पेटून देणे, असे असंख्य आंदोलन करून झालेले आहेत. साधारण दोन महिन्यापूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब या ठिकाणी पाहणी करून गेले. या पाहणीचा काहीही उपयोग झालेला नाही. नगरपरिषदेला मीटिंगमध्ये या डेपोच्या कंपाउंडच्या कडेने बांबूचे झाडे लावा असे तोंडी आश्वासन दिले. झाडे लावून प्लास्टिक नदी मध्ये भरपूर प्रमाणात जाणार आहे. यासाठी या डेपोला साधारण वीस फूट साईटचे कंपाउंड करून लवकरात लवकर आम्हा ग्रामस्थांना न्याय द्यावा. तसेच, यामध्ये संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना आता लक्ष देणार आहे. याची श्रीगोंदा नगरपरिषदेने याची नोंद घ्यावी.
स्रोत:(नानासाहेब शिंदे,संभाजी ब्रिगेड)
