श्रीगोंदयात साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार १३८.. गुन्हे दाखल..

दिनांक ६ ऑगस्ट,श्रीगोंदा:

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. सुरूवातीला लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. परंतु, तीन महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. लॉकडाऊन करताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी फिरणाऱ्यांसह मास्क न वापरणाऱ्यांवर कायदेशीर निर्बंध घातले होते. जिल्हाधिकार्‍यांनी पोलिसांना दिलेल्या निर्देशानुसार कायदा मोडणाऱ्या अश्या श्रीगोंदयातील १३८ जनांसह जिल्ह्यात १५ हजार ५८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हात पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये कलम १८८ प्रमाणे दाखल केलेले गुन्हे आहेत. या दाखल गुन्ह्यामध्ये आरोपीला १ महिना तुरुंगवास अथवा दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असेल तर सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे १८८ अंतर्गत गुन्हे दाखल झालेल्यांची डोकेदुखी वाढलेली आहे.परवानगी नसताना संचार करणे, मास्क न लावणे, विनापरवाना वाहतूक करणे, परवानगी नसताना दुकाने सुरू ठेवणे, अशा विविध कारणांवरून हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मोठ्या संख्येने गुन्हे दाखल करण्यात आल्याने, पोलिसांसमोर आता या गुन्ह्याचे आरोपपत्र (चार्जशीट) तयार करून न्यायालयात वेळेवर सादर करण्याचेही आव्हान उभे ठाकले आहे. तर नियम मोडणारांना या गुन्ह्यांमुळे चांगलीच अद्दल घडणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पोलिस स्टेशन निहाय दाखल गुन्ह्यांची संख्या:

कोतवाली ४४८२, तोफखान ५२८४, भिंगार कॅम्प १२७९, पारनेर १७८, नगर तालुका १०५, सुपा ४५, एमआयडीसी १८३, कर्जत ८१, श्रीगोंदा १३८, बेलवंडी ६५, जामखेड १०४, शेवगाव ११४, पाथर्डी ९३, नेवासा ७५, शिंगणापूर २८, सोनई ९६, शिर्डी ७५, राहाता ६४, लोणी १५३, कोपरगाव तालुका ५९, कोपरगाव शहर १४२, श्रीरामपूर शहर ६८८, श्रीरामपूर तालुका ५७, राहुरी २४२, संगमनेर शहर ८४२, संगमनेर तालुका १४४, राजूर ९१, अकोले६९, घारगाव ३८, आश्वी ४४ एकूण १५ हजार ५८.

स्रोत:(ऑनलाइन मिळालेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading