खेळाच्या मैदानातून थेट प्रशासनात

सह्याद्री पर्वताच्या कुशीत आणि दुष्काळाचा सामना करणाऱ्या मोहीतील (ता.माण) कृषीकन्या ललीता बाबर (भोसले) हीने खडतर परिस्थितीवर ॲथलेटीक्समध्ये अनेक नॅशनल, इंटरनॅशनल स्पर्धेत यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली. रिओ ऑलपिक मध्ये ३००० मीटर स्ट्रिपल चेसमध्ये अंतिम फेरीत धडक मारली. अशा जिगरबाज ललिताची महाराष्ट्र शासनाने उपजिल्हाधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे .

ललिता बाबर यांचे १६ सदस्याचे शेतकरी कुंटूब . सर्व मिळून ७ बहीणी आणि तीन भाऊ. ललीताचा जन्म २ जून १ ९ ८ ९ रोजी झाला. त्यावेळी घरात तेलाचा दिवाही नव्हता. ललीताला लहानपणी चालता येत नव्हते . तिसरी पर्यंत तिला शाळेत उचलून न्यावा लागत होते. त्यांच मुलीने अँँथलेटीक्स विश्वात अतुलनीय कामगिरी केली. ललीता मोहीत असताना खो – खो खेळायची . तीने खो – खो ची अनेक मैदाने गाजविली. पण या सांघिक खेळात इतर मुलींचा चांगला खेळ होत नव्हता . अपयश आल्यानंतर ललीता खुप दुःखी व्हायची.

२००३ मध्ये शिखर शिंगणापूरमध्ये तीन किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा भरली. या स्पर्धेत सहावीतील ललीताने पहिला नंबर पटकाविला. त्यावेळी तिच्या पायात साधी चप्पलही नव्हती . या मॅरेथॉनने तिच्या करिअरला दिशा मिळाली . नॅशनल फेडरेशनने घेतलेल्या सब ज्युनिअर ॲथेलेटीक्स स्पर्धेत भाग घेतला. त्यावेळी ललीताकडे शूज नव्हता . त्यावेळी एका मुलाचे शूज घेतले . शूज मोठे झाले म्हणून पाठीमागून सॉक्स घातले . अंतिम पहिल्या पाच मुलींमध्ये स्थान पटकाविले . छत्तीसगडमधील कोरब येथे झालेल्या सब ज्युनिअर ग्रामीण नॅशनलमध्ये पहिले सुवर्ण पदक पटकाविले दहावीत असताना तीने सोलापूर येथे झालेल्या दहा किमीच्या मॅरेथॉन स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. पुणे येथे झालेली क्रॉस कंट्री स्पर्धा झाली.

यामध्ये सुवर्ण पदक पटकविले . ललीताची रेल्वेमध्ये टीसी म्हणून नियुक्ती झाली. तिच्या यशाची दखल घेत भारतीय ॲथेलेटीक्स महासंघाने तिची प्रशिक्षणासाठी निवड केली. चेन्नई येथे नॅशनल स्पर्धेच्या मैदानात उतरली असताना तिला दुखापत झाली . दुखापत मोठी तिला दोन वर्षे मैदानापासून दूर राहावे लागले . २०० ९ पासून फिनिक्स भरारी घेत मैदानात उतरली . रेल्वे स्पर्धा नॅशनल स्पर्धेत सहभागी झाली . वेदनाम येथे झालेल्या आशियाई गेमसाठी निवड तिची परदेशातील पहिलीच स्पर्धा होती . तिला अपयश आले पण त्यातून खुप काही शिकायला मिळाले . २०१० ला दिल्लीत झालेली कॉमनवेल्थ स्पर्धा केली . स्पर्धा करताना पैशाची खुपच अडचण असायची . २०११ , १२ , १३ , १४ , १५ सलग पाच वर्षे भाग घेतला . पहिल्या तीन वर्षी सुवर्ण तर रौप्य पदक पटकावले . ३०० मीटर स्ट्रीपल चेस कडे लक्ष केंद्रित केले . २०१४ ला लखनौ येथे झालेल्या नॅशनल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकविले . या स्पर्धेत ९ मिनीटे ३४ सेंकदाचे नॅशनल टाईमिंग रेकॉर्ड केले .२०१४ ला दक्षिण कोरिया मध्ये झालेल्या ३ हजार मीटर स्ट्रीपलचेस मध्ये रौप्यपदक पटकाविले . २०१५ मध्ये बिजिंग येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ललिताने सर्व रेकॉर्ड मोडले .

मी एक शेतकऱ्याची मुलगी. घरात कोणत्या सुखसुविधा नव्हत्या . लहानपणी पायात स्लिपर घालुन पळायचे. पायाला खडे काटे रुतायचे, पण थांबली नाही . तब्बल १७ वर्षे धावत राहीली. ते क्षण आठवणी अंगावर शहारे आणणाऱ्या होत्या. अंगात खेळाचे कौशल्य असेल तर शाळकरी मुलांना खेळात करिअर करण्याची मोठी संधी आहे. तुमची परिस्थिती खडतर असेल. यश निश्चित आहे पण त्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागेल.:
ललीता बाबर, उपजिल्हाधिकारी , आंतरराष्ट्रीय धावपटू …

सुवर्ण पदक पटकाविले आणि ऑलपिक स्पर्धेसाठी पात्र ठरली . हा क्षण ललीताच्या दृष्टीने अविस्मरणीय ठरला आहे . शेतक – यांच्या या मुलीने विविध स्पर्धामध्ये २७ सुवर्ण, १३ कांस्य, १७ रौप्यपदकांची लयलूट करून भारतातील नंबर वन धावपटू म्हणून नावलौकिक मिळविला . फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीने ( फिक्कीने ) आणि भारताच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने २०१५ सालचे क्रीडा पुरस्कार प्रदान करताना बाबर यांना स्पोर्टस पर्सन ऑफ दी ईयर असे म्हटले होते . त्यांना अर्जुन पुरस्कार छत्रपती मिळाले. सन २०१६ मध्ये ललीताला अग्नीपंख फौंडेशन डॉ अब्दुल कलाम खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले . एखाद्या स्पधेर्साठी पैसे नसले तर आजोबा निवृत्ती शेजा – याकडून उसने पैसे आणत . गेल्या आजोबांनी निरोप घेतला . या घटनेचा ललीताला शॉक बसला होता . ललीताची आई निर्मला , वडील शिवाजीराव निरक्षर . पण साक्षरतेपेक्षा जादा शाहणपण अंगात भरलेले . त्यांनी ललिताला खेळासाठी त्यांनी पुर्ण सपोर्ट केला . चुलते गणेशराव यांनी मोठी साथ केली . त्यामुळे ललीता यशाच्या शिखरावर पोहचली आहे . ललिता ताईंनी मुंबई येथे ४२ किमी च्या स्पर्धेत ५ मॅरेथॉन पुर्ण केलेले आहे . तसेच ३००० मीटर ट्रीपल चेस पुर्ण केलेले आहे. १६ मे २०१७ रोजी ललीताचे सांगोला तालुक्यातील लिगाडेवाडीतील सनदी अधिकारी संदिप भोसले यांच्याशी विवाह झाला . वाढते वय आणि सतत होणारी दुखापत आणि भारतातील धावणा – या मुलींना संधी मिळाली पाहिजे . हे विचारात घेतले . ललीताने खेळाला गुडबाय केला पण महाराष्ट्र शासनाने तिला उपजिल्हाधिकारी पदी नेमणुक करून ॲथेलेटीक्स मधील मॅरेथॉन खेळाचा सन्मान केला आहे. खेळाच्या मैदानातील ललीता थेट प्रशासकीय सेवेत एक क्लास वन अधिकारी म्हणून दाखल झाली आहे. हे तीने केलेल्या कठोर परिश्रमाचे फख आहे .

शब्दांकन : प्रा.ज्ञानेश काळे (काळे सर हे ललीताचे प्रशिक्षक आहेत)

स्रोत:(अग्निपंख फौंडेशन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading