श्रीगोंद्यासह पारनेर, नगर midc परिसरात केलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पुणे पोलिसांच्या ताब्यात..

दिनांक ३ फेब्रुवारी, श्रीगोंदा:

राजू मोहनलाल मीना वय ३४ वर्षे राहणार दातारामगड जिल्हा शिखर, राजस्थान व पप्पू गोपाल चौधरी वय वर्ष ३० राहणार दातारामगड जिल्हा शिखर, राजस्थान या दोन आरोपींनी टोळी बनवत बोलेरो/पिकप चा वापर करत, एटीएम मशीन चोरण्याचा प्रकार केला होता. या चोरीत त्यांचे काही साथीदारही सामील होते.

बारामती तालुक्यातील मुर्टी याठिकाणी असलेल्या टाटा इंडिकॅश कंपनीचे एटीएम मशीन दिनांक १६ जानेवारी रोजी पहाटे चोरीला गेले होते. यात सुमारे ४ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत चालू होता त्यांना वडगाव पोलिसांकडून सहकार्य मिळाले. नमूद तपासादरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची बोलेरो असल्याचे निष्पन्न झाले. या अनुषंगाने स्थानिक पोलिस प्रशासनासह गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता नमूद गाडी रांजणगाव शेजारील कारेगाव परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्ह्यात संशयीत याच वाहनांचा वापर करत होते.

बुधवार दिनांक २ फेब्रुवारी २२ रोजी रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या सहकार्याने वाहनाचा शोध घेण्यात आला. सराईत रेकॉर्डवरील आरोपी बनवारीलाल मीना त्याचा, मित्र बाबुलाल चौधरी सोबत वाहन वापरत होता. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, तोही या गुन्ह्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांच्या तपासात नमूद वाहनाचा वापर करून जवळा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथील एटीएम मशीन चोरी केल्याचे आरोपींनी कबूल केले. वापरत असलेल्या वाहनाची कागदपत्रे त्यांच्याकडे नसल्याने त्यासंबंधी तपास केला असता, हे वाहनही चोरीला गेल्याची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात मूळ मालकाने दाखल केली असल्याचे तपासात समोर आले.

पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सपोनि सचिन काळे, संदीप मुळे, वडगावचे सहाय्यक फौजदार तुषार यांनी ही कामगिरी केली आहे.

नमूद दोन्ही आरोपींनी साथीदारांसह वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अहमदनगर जिल्ह्यातील तोपखाना, श्रीगोंदा, पारनेर, अहमदनगर एमआयडीसी येथे अशाच प्रकारचे चोरीचे गुन्हे केले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading