मागील २५ वर्षातील ही पहिलीच घटना आहे.!

दिनांक ३ फेब्रुवारी, श्रीगोंदा:

अनेक वेळा रब्बी आवर्तनावरून कुकडी प्रकल्पाचा नेहमीच वाद झाला आहे. नमूद प्रकल्प तालुक्यासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, यावेळी काटेकोरपणे केलेल्या पाण्याच्या नियोजनामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत झाली आहे. या प्रक्रियेचा फायदा आता लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना होणार आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून धरणातून रब्बी हंगामातील पिकांसाठी डिंभे उजवा व कुकडी डावा कालव्यात सोडण्यात आलेल्या पाण्याच्या योग्य नियोजनामुळे सुमारे २.५ टीएमसी पाण्याची बचत झाली आहे. रब्बी आवर्तनात झालेल्या मोठ्या प्रमाणातील बचतीमुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मागील पंचवीस वर्षात या प्रमाणात बचत झालेली ही पहिलीच घटना आहे.

सिंचन भवन पुणे येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कुकडी प्रकल्पाचे. रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात आले होते. त्याप्रमाणे करमाळा, श्रीगोंदा, कर्जत, पारनेर, जुन्नर या तालुक्यांना जोडणाऱ्या २४९ किलोमीटर कुकडी डावा कालव्यात जानेवारी १ ते फेब्रुवारी १३/२०२२ दरम्यान ४३ दिवसांच्या कालखंडात ५. ३७५ टीएमसी पाणी वापरून नमूद चार तालुक्यातील सुमारे १ लक्ष हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांचे सिंचनाचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, टेल टू हेड या पद्धतीने योग्य नियोजन झाल्याने, ३१ दिवसात ३.६५८ टीएमसी पाण्याचा वापर झाला.

त्यातून १ लक्ष हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांना सिंचन करत नमूद आवर्तन पूर्ण करण्यात आले. या कारणाने कुकडी डावा कालवा आवर्तनात सुमारे १. ७१७ टीएमसी पाण्याची बचत झाली आहे. तसेच, डिंभे उजवा कालवा आवर्तनात ०.७९१ टीएमसी पाण्याची बचत झाली आहे.

यामुळे बचत झालेले २.५८ टीएमसी पाणी उन्हाळी हंगामासाठी वापरणे शक्य होणार आहे. कुकडीच्या आवर्तनावरून होणारा वाद सर्वांनाच माहित आहे. आज अखेर कुकडी प्रकल्पात १६.४४ टीएमसी म्हणजे ५५.४०% उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे.

स्त्रोत:(ऑनलाइन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading