दिनांक ८ सप्टेंबर, श्रीगोंदा:
तालुका कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये तरुणांची ताकद एकत्रित करत, सामान्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी महेश कोथिंबिरे व मंगेश सूर्यवंशी हे दोन युवक कार्यकर्ते आगामी जि.प. व पं.स. निवडणुक रिंगणात सर्व ताकतीने उतरणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, निवडणूक प्रक्रियेमध्ये पक्ष, पक्ष चिन्ह, व्यक्ती व दिलेल्या आश्वासनांचा विचार करून मतदाता, मताधिकार बजावत असतो. अनेक वर्षांपासून या प्रक्रियेत कार्यक्षेत्रातील तरुणांना व सामान्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नाराज झालेला बेरोजगार तरुण व सक्रिय कार्यकर्ते बरोबर घेऊन, त्यांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी या निवडणूक प्रक्रियेत उतरणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते महेश कोथिंबिरे व मंगेश सूर्यवंशी यांनी ठरवले आहे.

माध्यमांना दिलेल्या माहितीत कोथिंबिरे व सूर्यवंशी यांनी सांगितले आहे की, आढळगाव गटातून सर्वसामान्यांच्या मूलभूत समस्यानां न्याय देण्यासाठी तसेच, तरुणांचे महत्वपूर्ण विषय घेऊन, सामान्य कार्यकर्त्याची ताकद दाखवण्यासाठी आम्ही आगामी निवडणूक लढवणार आहोत. पक्षाने आम्हांला तिकीट नाकारले.! तरी, आदरणीय कुंडलिक (तात्या) जगताप व शिवाजीराव नागवडे (बापूंच्या) आशीर्वादाने अपक्ष निवडणूक लढवून, साधारण माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
घोडेगाव ग्रामपंचायत २०२० निवडणुक पूर्ण ताकतीने लढवून ग्रामपंचायतीत विजय मिळवला. गावामध्ये विविध विकास कामं, सामान्यांना मूलभूत सुविधां रस्ते, पाणी, वीज सह त्यांच्या निरनिराळ्या समस्या सोडण्यास सुरुवात केली. या विकास कामांच्या जोरावर आढळगाव गणात काम करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे.

अधोरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून काम करत असतांना, सर्वांगिन विकास व सर्वांचे मूलभूत प्रश्न डोळ्यासमोर ठेवून, काम केले आहे. सर्व समावेशक कार्य व सामान्यांचे हित मनात कायम असून, कार्यक्षेत्रातील विकास कामांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. गटातही सक्रिय कामं व जनसेवा करण्याची संधी मिळावी अशी आशा आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महेश कोथिंबिरे व मंगेश सूर्यवंशी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्यांनी नमूद केले की, आमचा राजकीय पिंड नाही. मात्र, समाजसेवेची आवड आहे. समाजाप्रती आपले काही देणे आहे. सामान्यांचे विविध प्रश्न अनेक वर्षांपासून सोडवत आहोत. परंतु, जर त्याला राजकीय प्रक्रियेची जोड मिळाली. तर, अधिकारात विकास कामं व सर्वसामान्यांची सेवा करण्याची संधी उपलब्ध होईल. या उद्देशाने सदरील निवडणुकांमध्ये सर्व ताकदीनिशी सक्रिय सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सोबत मोठी तरुणांची फळी, सक्रिय मित्र व कार्यकर्त्यांची साथ लाभणार असल्याचेही त्यांनी विशेष नमूद केले आहे.
स्त्रोत:(प्रसिद्धीपत्र)
