श्रीगोंदयात पत्रकारितेच्या नावाखाली अराजकता.? पत्रकार की.? खंडणीखोर..?

दिनांक ९ सप्टेंबर, श्रीगोंदा:

तालुका कार्यक्षेत्रात पत्रकारांचा मोठा भरणा झाला आहे. पत्रकारांच्या माध्यमांतून समाजाला भल्या बुऱ्या गोष्टी समजतात. मात्र, एका एका गावात डझन डझन पत्रकार होण्यामागे नेमके कारण काय आहे.? वास्तवात पत्रकारितेचे शिक्षण, अधिकृत डिग्र्या, अनुभव किंवा त्यातील अधिकृत माहिती ज्ञान असलेली पत्रकारांची संख्या किती .? यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे. त्याच बरोबर जिल्हाधिकारी तसेच जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे नमूद असलेले किंवा नोंद असलेले पत्रकार किती .? याबाबत संभ्रम आहे. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासन अधिकृत/नोंदणीकृत पत्रकारांची माहीती घेण्याचा प्रयत्न करीत असून, स्थानिक प्रशासनाने येथे सर्व्हेक्षणही केलेले आहे.

सविस्तर असे की, तालुक्यात चालू असलेल्या विविध घडामोडींचा आढावा पत्रकारांच्या मार्फत मिळतो. मात्र, श्रीगोंदा तालुक्यात अशी काही टवाळखोर, खंडणीखोर पत्रकार मागील बऱ्याच अनुचित घटनांपासून समोर येऊ लागले आहेत.

भीमा, घोड नदीपात्रात चालू असलेल्या वाळू तस्करीवर ह्या भुरट्या टीमने डल्ला मारल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी जाऊन बातमीची धमकी देणे, अन्यथा, वाळूचा डंपर द्या, पैसे द्या, असा हा धंदा पत्रकारितेच्या नावाखाली काही पत्रकार म्हणणाऱ्यांनी चालवल्याचे समजते आहे.

विकास कामांमध्ये हस्तक्षेप करत, ठेकेदारांना कामात त्रुटी दाखवणे. काम व्यवस्थित नाही. दुरुस्त करा, पुन्हा करा,अन्यथा बातमी करतो. म्हणत अनेकांना धमकवल्याचे निदर्शनास येत आहे.

अवैध व्यवसाय करणाऱ्या गावगुंडांना बातमीची धमकी दाखवून, गंडवणे.! असेही प्रकार सर्रास घडलेले आहेत.

काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा तालुका बार असोसिएशनच्या एका वकिलाला धमकावले म्हणून, त्या तोतया पत्रकारावर पोलिसांत कारवाई करण्याची मागणी वकिलांनी केली होती. श्रीगोंदा तहसील कार्यालयात एका प्रकरणाच्या निमित्ताने वकील व प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याबरोबर झालेल्या वादाची मध्यस्थी नमूद इसमाने केली होती. मी पत्रकार आहे.! तू वकील असशील.? तुला तर, जेसीपी लावूनच उचलीन.. अशी असंविधानिक भाषा त्या भुरट्या पत्रकाराने केली होती. त्यावेळेसही तो पत्रकार नसतांना काही अनुभवी पत्रकारांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला मध्यस्थी करून, तो प्रकार मिटवला होता.

पत्रकारितेशी वास्तविक संबंध नसलेल्या नमूद इसमाला तालुक्यातील काही अनुभवी पत्रकारांनी पाठबळ देऊन, ताकद दिल्याने. त्याच्या कुकृत्याचा आलेख वाढत गेला आणि कालपर्यंत पत्रकारितेच्या नावाखाली लोकांना छळण्याचा अनं अवैध व्यावसायिकांना पिळण्याचा उत्कृष्ट धंदा त्याच्या हाती लागला. मात्र, यातूनच त्यावरही अक्षेप होतील आणि त्याच्या या आक्षेपार्ह वर्तनाचा हिशोब त्याला चुकता करावा लागेल. एवढे भान त्याला राहिले नाही. हे दुर्भाग्य..!

तालुक्यातील जनसज्ञापन व वृत्तपत्र विद्या, बीजे, एमजे, मास कम्युनिकेशन, जर्नालिझम झालेल्यांसह अनेक वर्षांपासून वृत्तपत्रात सक्रिय असलेल्या अनुभवी पत्रकारांनी एकत्र येत तालुक्यातील तोतय्या व डुप्लिकेट पत्रकारांचा भांडा फोड करावा व गैर घटनांतुन होणारी श्रीगोंदयातील अधिकृत व नोंदणीकृत पत्रकारांची बदनामी थांबवावी.

तालुक्यातील सामान्य माणसांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही असल्या पत्रकारांसह त्यांच्या भोंदू टीमपासून सतर्क राहावे.. अशी चर्चा आहे. श्रीगोंदा तालुक्यात पत्रकारितेच्या नावाखाली अराजकता माजवणारे अराजक तत्वज्ञान उदयास येऊ लागले आहे. यावर प्रशासनाने लवकरच उपचार सुरू करून, कालपर्यंतच्या घटनांची पार्श्वभूमी तपासावी… सत्य उजेडात येईल.. असे अनेकांचे मत आहे.

सूचना: कृपया कोणीही हा विषय अतिरिक्त घेऊ नये. हे प्रकरण स्वघोषित अनधिकृत पत्रकारांसाठी आहे.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading