श्रीगोंदा, दिनांक १६ जून २०२५:
श्रीगोंदा तालुक्यातील प्रशासकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली आहे – एका वरिष्ट आणि बहुचर्चित अधिकाऱ्याच्या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणाची! या घटनेमुळे संपूर्ण प्रशासन हादरले असून, तालुक्यातील विविध कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची खळबळ उडाली आहे.

सदरील प्रकरणात, एका महिलेने प्रेमसंबंधाच्या माध्यमातून एका वरिष्ठ अधिकाऱ्याला जाळ्यात ओढल्याची माहिती पुढे येत आहे. अधिकाऱ्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसू नये म्हणून त्याने प्रकरण लपवण्याचा मार्ग स्वीकारत, तडजोडीच्या माध्यमातून जवळपास १५ ते २० लाख रुपये महिलेच्या मागणीनुसार दिल्याची जोरदार चर्चा आहे.

या प्रकारामुळे संबंधित अधिकाऱ्याची एकीकडे प्रतिमा मलीन झाली असली, तरी दुसरीकडे ही महिला ‘ब्लॅकमेलर’ असल्याचेही सांगितले जात आहे. तिचा हेतू सुरुवातीपासूनच आर्थिक लाभ मिळवण्याचा होता का, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रेमाच्या नावाखाली हा फसवणुकीचा प्रकार उघड होत असताना, या महिलेला कोणाचा पाठिंबा होता का, याचीही चर्चा सुरू आहे.

गेल्या काही वर्षांत श्रीगोंदा तालुक्यात अशा स्वरूपाच्या घटना घडल्याचे उघड झाले असले, तरी सध्या चर्चेत असलेल्या या प्रकरणात एक सर्वसमावेशक आणि संवेदनशील कार्यालयाचा अधिकारी अडकलेला असल्याने खळबळ अधिकच वाढली आहे. विशेष म्हणजे, तालुक्यात डझनभर प्रशासकीय कार्यालये असताना पीडित अधिकारी नेमका कोण, याची उत्सुकता जनतेत आहे.

पूर्वीही एका गावातील महिलेचे आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचे प्रेमसंबंध एका वारीच्या माध्यमातून उघडकीस आले होते. मात्र ते प्रकरण परस्पर संमतीने असल्याने फारसा गदारोळ झाला नव्हता. मात्र या नव्या प्रकरणात महिलेने केवळ भावनिक नात्याचा आधार घेत आर्थिक फटका दिल्याची चर्चा असल्याने, हे केवळ एक “हनी ट्रॅप” नसून, सुनियोजित ब्लॅकमेलिंग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणाची चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत असून, संबंधित अधिकाऱ्याने यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. प्रकरण शांततेत रफादफ करण्याचा त्यांचा प्रयत्न काहीसा यशस्वी ठरला असला, तरी या प्रकाराने तालुक्यातील प्रशासकीय साखळीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
– स्रोत:(अधिकृत माहिती)

श्रीगोंदा तालुक्यातील कृषी विभागातील एका महिलेने , एका निवृत्त अधीकार्यास महिला आयोगाकडे तक्रार करेल या धमकीने blackmail करत सुमारे ८.० लाख रु खंडणी मागितल्याचे ऐकिवात आहे.आणि त्या करीता महिला कर्मचार्याच्या पतीने दलाली केली होती अशीही चर्चा ऐकली आहे .