दिनांक ९ ,जून,श्रीगोंदा:
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने व श्री कल्याणरावजी दळे (अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ) यांच्या मार्गदर्शनाखाली आज श्रीगोंदा तहसील कार्यालय येथे झालेल्या आंदोलनाला राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फोनवरून सगळ्या मागण्या जाणून लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येइल, असे सांगितले.
अनुराधा ताई नागवडे (सभापती.जिल्हा परिषद नगर,सरचिटणीस काँग्रेस कमिटी), मार्केट कमिटीचे माजी सभापती बाळासाहेब नाहटा, भाजपा नेते. राजेंद्र महस्के, लक्ष्मणराव नलगे (संचालक मार्केट कमिटी), काँग्रेसचे युवा नेते स्मितल वाबळे, प्रहार’चे तालुकाध्यक्ष वामनराव भदे, सतिषशेठ पोखरणा, नगरसेवक संतोष क्षिरसागर, नगरसेवक प्रशांत गोरे, प्रा. सुनील माने (संचालक,श्रीगोंदा साखर कारखाना) अमोल अनभुले (श्रीगोंदा शहरअध्यक्ष भाजपा युवा मोर्चा) यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
यावेळी प्रशासनाच्या वतीने श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन व श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी निवेदन स्वीकारले. या आंदोलनात श्रीगोंदा तालुक्यातील सर्व नाभिक बांधव उपस्थित होते.
