दिनांक ९ जून,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या ‘परिक्रमा’ शैक्षणिक संकुलातील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी कु. वैशाली जठार हिने एम इ टी, इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, भुजबळ नॉलेज सिटी, नाशिक आयोजित ‘फार्मास गॉट टॅलेंट’ या स्पर्धेत भाग घेऊन कविता लिखाण मध्ये प्रथम क्रमांक पटकावला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ यांनी दिली.तिला प्रा. वैशाली फाळके यांचे मार्गदर्शन मिळाले.
कोविड-१९ साथीच्या च्या लॉकडाउन मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांचा वक्तिमत्व विकास व्हावा तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत अभ्यासेतर उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी परिक्रमा सतत प्रयत्नशील असते.
यशस्वी विद्यार्थिनीचे परिक्रमा संकुलाचे सचिव श्री. विक्रमसिंह पाचपुते व संचालक श्री. प्रतापसिंह पाचपुते यांनी अभिनंदन केले.
