दिनांक ९ मे,श्रीगोंदा:
श्रीगोंदयातील अग्नीपंख फौंडेशनने कोरोना पाॅझिंटीव्ह रुग्णांचा श्वास बनलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील १२ कोविड सेंटरला ८० हजार रुपये किंमतीच्या औषधी गोळ्या, सॅनिटाइयर, मास्कची भेट देण्याचा उपक्रम राबविला आहे.
तालुक्यात शासकीय कोविड सेंटर श्रीगोंदा, कर्मवीर भाऊराव पाटील (कोळगाव), अजित पवार (पिंपळगाव पिसा), शिवशंभो (घारगाव), श्री.व्यंकनाथ (लोणीव्यंकनाथ), भैरवनाथ (बेलवंडी), पद्मभूषण आण्णासाहेब हजारे (देवदैठण), भैरवनाथ (मढेवडगाव), सिध्देश्वर (आढळगाव), चांडेश्वर (चांडगाव), संत शेख महंमद महाराज (श्रीगोंदा), सिध्देश्वर (लिंपणगाव), सुद्रिकेश्वर (पारगाव सुद्रिक), हंगेश्वर (चिंभळे) यांना मदत वाटप करण्यात आली.
ही मदत पांडुरंग खेतमाळीस, शिवप्रसाद उबाळे, मच्छिंद्र सुपेकर, शरद जमदाडे, राहुल कोठारी, प्रा.संजय लाकुडझोडे, उत्तम डाके, सतिशराव लगड, मिलिंद भोयटे, प्रशांत गोरे, गणेश डोईफोडे, मनोज जगताप, बापू ढवळे, अमोल गव्हाणे, रमजान हवालदार, सुनील गायकवाड, युवराज पवार, मधुकर काळाणे, बंडू खंडागळे, किसन वऱ्हाडे, विजय हरिहर, अविनाश निंभोरे, दिपक वाघमारे यांच्या हस्ते वाटप करण्यात आली आहे.
चांगला उपक्रम: श्रीगोंदा तालुक्यातील कोविड सेंटर सामाजिक जाणीवेतून कोरोना पाॅझिंटीव्ह रुग्णांना जीवदान देण्याचे सत्कर्म केले आहे. अशा कोविड सेंटरला मदत करण्याचा अग्नीपंख फौंडेशनने उत्कृष्ट उपक्रम राबविला: पांडुरंग खेतमाळीस,श्रीगोंदा
फोटो: श्रीगोंदा येथील शासकीय कोविड सेंटरसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांचेकडे मदत सुपूर्त करताना मच्छिंद्र सुपेकर, राहुल कोठारी..
स्रोत:(अग्निपंख फौंडेशन)
