श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात आदिवासी समाजाचा पहिला उमेदवार अजित भोसले यांची उमेदवारी दाखल..

दिनांक २५ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात आज एका ऐतिहासिक घटनेची नोंद झाली आहे. श्रीगोंद्याचे सामाजिक कार्यकर्ता अजित भोसले यांनी आदिवासी पारधी समाजातर्फे पहिल्यांदाच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या प्रसंगी आदिवासी, ओबीसी आणि मागासवर्गीय समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माध्यमांना मुलाखत देताना अजित भोसले आणि समाज बांधव..

माध्यमांशी चर्चा करताना अजित भोसले यांनी सांगितले की, “माझी उमेदवारी आदिवासी पारधी समाजातून महाराष्ट्रातील पहिलीच आहे. अनेक वर्षांपासून आदिवासी पारधी समाज आणि दुर्लक्षित घटकांसाठी कार्यरत राहिल्याने मला समाजातील नागरिकांचे आशीर्वाद मिळणार आहेत.” त्यांनी समाजातील गोरगरीब जनतेसाठी घरकुल, गायरान जमिनी हक्क, शिक्षण, बेरोजगारांसाठी कर्जवाटप आणि अनेक अन्य योजनांचे सहाय्य दिल्याचे सांगितले.

भोसले यांच्या सांगण्यानुसार, श्रीगोंदा तालुक्यात पारधी आदिवासी समाजाची १५ हजारांहून अधिक लोकसंख्या आहे. संविधान प्रचारक म्हणून गेल्या दशकभरात समाजातील विविध अत्याचारांवर आंदोलने, तसेच ॲट्रॉसिटी प्रतिबंधक कार्यक्रम घेतले आहेत. भोसले यांनी समाजाच्या सबलीकरणासाठी विविध शिबिरे व कार्यशाळांचे आयोजन केले आहे, ज्यात प्रशासकीय अधिकारी,  जिल्हाधिकारी सिद्धाराम सालेमठ, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड, आणि पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील यांची उपस्थिती होती.

उमेदवारी अर्ज दाखल करताना समाज बांधवांमध्ये मोठा उत्साह होता. या प्रसंगी मुकेश भोसले, रवींद्र भोसले, योगेश भोसले, काका काळे, जयश्री काळे, दीक्षा भोसले, अश्विनी भोसले, उषा भोसले,  ईश्वर काळे, सुधीर भोसले, महेश काळे, रतन पवार, गुलाब काळे, आपला काळे, बाबू काळे, नवनाथ भोसले, बबन भोसले, रामसिंग भोसले यांसह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.

अजित भोसले यांनी तालुक्यातील वंचित, शेतकरी, कष्टकरी, आणि मजूर वर्गाकडून या निवडणुकीत पाठिंबा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

स्रोत: (मुलाखत)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading