उद्योगपती बाप्पू शेठ माने यांचा बहुजन समाज पार्टीत प्रवेश; विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी ताकतीने उभे राहणार..

दिनांक २५ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:

आज श्रीगोंद्यात आयोजित बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा व तालुका कार्यकारणी बैठकीत, श्रीगोंद्यातील प्रसिद्ध उद्योगपती बाप्पू शेठ माने यांनी बहुजन समाज पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाप्रसंगी त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करत, पुरोगामी विचारधारेच्या आधारावर, आगामी विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या भाषणात बहुजन समाजासाठी, विशेषतः सर्वसामान्य व दुर्लक्षित घटकांसाठी कार्य करण्याची आपली भूमिका अधोरेखित केली.

बाप्पू शेठ माने यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “सर्वसामान्यांच्या प्रश्नांना पुढे नेण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे, बहुजन समाज पार्टीच्या ध्येयधोरणाशी जुळणाऱ्या पुरोगामी चळवळीशी स्वतःला जोडत आगामी निवडणुकीत आमदारकीसाठी ताकतीने उभा राहणार आहे. जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी समजून घेऊन आमदारकीला निवडून देण्याचे समाज बांधवांना आव्हान करणार आहे.”

या प्रसंगी बसपाचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ यांनी देखील आपले विचार मांडले. त्यांनी बहुजन समाज पार्टीचे ध्येय आणि उद्दिष्टे विशद करत, नवीन सदस्यांचे स्वागत केले व त्यांना सामाजिक बांधिलकीसाठी कार्यरत राहण्याचा सल्ला दिला.

या प्रवेश प्रसंगी बाप्पू शेठ माने यांच्यासोबत लताबाई शेळके यांनी देखील बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला.

या बैठकीत अनेक पदाधिकारी उपस्थित होते, ज्यात श्रीगोंदा विधानसभा अध्यक्ष विठ्ठल म्हस्के, उपाध्यक्ष कानिफनाथ बर्डे, महासचिव संजय घोडके, कोषाध्यक्ष अशोक मोरे, नितीन जावळे, आबासाहेब रामफळे, अंबादास घोडके, सलीम अत्तार, भीमराव घोडके, बलभीम घोडके, स्वप्नील पवार, सुमन चव्हाण, संपत पवार, सत्यवान शिंदे, आणि संतोष काळे यांचा समावेश होता. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने बाप्पू शेठ माने यांच्या उमेदवारीस पाठिंबा देण्याचे ठरवले.

आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार बाप्पू शेठ माने यांच्या सहकार्यासाठी बहुजन समाज पार्टी संपूर्ण ताकदीने सज्ज झाली आहे.

स्रोत:(बैठक)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading