दिनांक २५ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज विक्रीत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. आज २५ ऑक्टोबर रोजी अखेरपर्यंत एकूण १०३ उमेदवारी अर्ज खरेदी करण्यात आले असून, हे अर्ज विविध इच्छुक उमेदवारांकडून घेतले जात आहेत. आजच्या दिवसातच २२ फॉर्मांची विक्री झाली, यामध्ये नामांकित उमेदवारांसह स्थानिक नेत्यांचा सहभाग आहे.
मुख्य उमेदवारांमध्ये राहुल कुंडलिकराव जगताप, घनश्याम प्रतापराव शेलार, सुवर्णा सचिन पाचपुते, अरविंद बाळकृष्ण कारंजकर, सागर रत्तन कासार आणि अजित बबन भोसले यांच्या नावांचा समावेश आहे. त्यांनी आपल्या नामनिर्देशन पत्रांची नोंदणी यशस्वीरीत्या केली आहे.
आजच्या दिवशी गोरख दशरथ आळेकर (श्रीगोंदा), निलेश नंदू गायकवाड (कोसेगव्हाण), रघुनाथ हरिभाऊ सूर्यवंशी (आढळगाव), बाळासाहेब नानासाहेब दुतारे (श्रीगोंदा), शिवाजी रामा समदडे (श्रीगोंदा), संदीप बलभीम नागवडे (वांगदरी), पोपटराव आनंदराव खेतमाळीस (श्रीगोंदा), महेंद्र दादासाहेब शिंदे (डिकसळ), राहुल संजय छत्तीस (आढळगाव), अनंता भुजंगराव पवार (वांगदरी) आणि इतर २१ उमेदवारांनी २२ अर्ज खरेदी केले आहेत.
अधिकृत माहितीनुसार, अर्ज विक्रीची गती आणि उमेदवारीसाठी दाखल होणारे उमेदवार पाहता, येत्या निवडणुकीत काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे.
स्रोत:(अधीकृत माहिती)





