श्रीगोंदा: किराणा व्यापाऱ्यावर शस्त्रांनी हल्ला, ३.६ लाखांची रोकड लंपास..

दिनांक २५ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार मार्गावर एका किराणा व्यापाऱ्याला अनोळखी इसमांनी धारधार शस्त्राने हल्ला करून ३.६ लाख रुपयांची रोख रक्कम लुटल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:१० च्या सुमारास घडली.

फिर्यादी अभय अमृतलाल मांडोत (वय ५८ वर्षे), हे श्रीगोंदा येथून किराणा माल घेऊन टाकळी लोणारकडे जात असताना पोई फाटा मार्गावरील मते वस्ती जवळ चार अज्ञात व्यक्तींनी त्यांचा टेम्पो अडवला. हल्लेखोरांनी धारधार हत्याराने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांना जखमी केले. त्यानंतर, त्यांच्याकडील ३.६ लाख रुपये बळजबरीने हिसकावून चोरले.

घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, श्रीगोंदा पोलिस अधिक तपास करत आहेत.

स्रोत:(अधीकृत माहिती)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading