दिनांक २४ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा २२६ विधानसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज १५ उमेदवारांनी २४ उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. आजपर्यंत एकूण ४९ लोकांनी ८१ अर्ज विकत घेतले आहेत, ज्यामुळे निवडणुकीत मोठी स्पर्धा आणि रंगत वाढली आहे.
अर्ज खरेदी करणाऱ्या प्रमुख उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
१) तुकाराम बाबू कोकरे, चिंबळा – स्वतः उमेदवार.
२) दत्तात्रय आप्पा वाघमोडे – स्वतः उमेदवार.
३) गोकुळ रामदास गाडेकर, म्हातार पिंपरी – संदीप दत्तात्रय दहातोंडे यांच्या साठी अर्ज घेतला.
४) अण्णासाहेब सिताराम शेलार, बेलवंडी बुद्रुक – स्वतः उमेदवार.
५) संभाजी शिवाजी घोडके, चांडगाव – बाळासाहेब नानासाहेब दुतारे यांच्या साठी अर्ज घेतला.
६) प्रवीण कुमार छगनराव नागवडे, श्रीगोंदा – राजेंद्र शिवाजी नागवडे यांच्या साठी अर्ज घेतला.
७) धर्मनाथ संपतराव काकडे, लोणी – अनुराधा राजेंद्र नागवडे यांच्या साठी अर्ज घेतला.
८) योगेश दत्तात्रय खेंडके, मांडवगण – स्वतः उमेदवार.
९) प्रमोद राजेंद्र मस्के, चांडगाव – राजेंद्र भाऊ म्हस्के यांच्या साठी अर्ज घेतला.
१०) सतीश दादा चोरमले, वांगदरी – पृथ्वीराज राजेंद्र नागवडे यांच्या साठी अर्ज घेतला.
११) अनिल जयसिंग घनवट, श्रीगोंदा – स्वतः उमेदवार.
१२) नौशाद मोशीलाल शेख, मांडवगण – स्वतः उमेदवार.
१३) अनिल दशरथ तुपे, श्रीगोंदा – स्वतः उमेदवार.
१४) संपतराव बापूराव खरात, आनंदवाडी – स्वतः आणि इतरांसाठी अर्ज घेतला.
१५) स्वप्निल सुरेश लाटे, लोणी व्यंकनाथ – सतीश दशरथ निंबाळकर यांच्या साठी अर्ज घेतला.
मतदारसंघात निवडणुकीची तयारी जोरात असून, उमेदवारांची वाढती संख्या आणि त्यांचे स्थानिक मतदारांमध्ये असलेले समर्थन यामुळे वातावरण अधिकच उत्साहवर्धक झाले आहे.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)





