श्रीगोंदा – नगर विधानसभेसाठी घनश्याम अण्णा शेलार यांना कार्यकर्त्यांचा प्रखर पाठिंबा..

दिनांक २४ ऑक्टोबर २०२४ श्रीगोंदा:

आज घनश्याम अण्णा शेलार मित्रमंडळाने आयोजित केलेल्या एल्गार मेळाव्यात अत्यंत भावनिक क्षण अनुभवायला मिळाले. श्रीगोंदा-नगर विधानसभेसाठी तिकीट देण्याच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी पसरली आहे. चुकीच्या उमेदवारांची निवड केल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

उपस्थित जनसमुदाय

निःस्वार्थपणे काम करूनही घनश्याम अण्णा शेलार यांचा हक्क नाकारल्याने उपस्थित हजारो कार्यकर्ते अत्यंत अस्वस्थ झाले होते. त्यांनी घनश्याम अण्णा शेलार यांच्या बाजूने ठाम उभे राहून त्यांना आगामी निवडणुकीत लढण्याचा जाहीर पाठिंबा दिला. या पाठिंब्यामुळे प्रोत्साहित होऊन घनश्याम अण्णा शेलार यांनी, “मी मागे हटणार नाही, प्रखर संघर्ष करणार,” अशी स्पष्ट घोषणा केली.

घनश्याम आण्णा शेलार यांच्या उमेदवारीसाठी सकारात्मक प्रतिसाद देताना उपस्थित जनसमुदाय…

हजारो उपस्थित समर्थकांसमोर बोलताना शेलार यांनी या लढ्याचा निर्धार व्यक्त केला आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे आपण विजयासाठी प्रखर संघर्ष करणार असल्याचे ठामपणे सांगितले.

स्रोत:(एल्गार मेळावा)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading