अजनूजची प्रेरणादायी शाळा..

भिमा नदीच्या काठावर वसलेले जवळपास चार हजार लोकसंख्येच अजनूज हे गाव. वळणेश्वर हे ग्रामदैवत. २००१ साली गावातील मीनानाथ रघुनाथ गिरमकर कारगिल युध्दात शहिद झाले. गावातील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शहिद पुतळा उभारण्यात आला. या गावातील शाळेला आज लौकीक प्राप्त झाला आहे.

२०१०-११ साली बाळासाहेब गिरमकर जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ समितीचे सभापती असताना या प्राथमिक शाळेच्या नव्या दुमजली इमारत उभी राहिली. प्रशस्त मैदान. चोहीबाजूने हिरवीगार झाडी, एका बाजूला शहिद स्मारक असा परिसर आहे. या शाळेत सध्या १० शिक्षक असून बाळासाहेब अनपट हे मुख्याध्यापक म्हणून काम पाहतात. ही शाळा तेथील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या कल्पकतेमुळे व उपक्रमशीलतेमुळे नेहमी इतरांना प्रेरणा देत आहे. शाळेमध्ये संगणक प्रयोगशाळा आहे. या संगणक कक्षामध्ये विद्यार्थी सातत्याने अभ्यास करत असतात. प्रत्येक विद्यार्थ्यांना संधी दिली जाते, यामुळे जून महिन्यात सहावीच्या दोन विद्यार्थी अथर्व जाधव व सार्थक जाधव हे दोघांनी संगणकाची परिक्षा चांगल्या गुणांनी उर्तीण झाले.

विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या सहकायार्ने शाळेतील प्रत्येक वर्गात ४० एलईडी बसविण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थी इ – लर्निंगचे धडे गिरवत आहेत. शाळेत स्वतंत्र प्रयोगशाळा आहे. बौध्दिक विकासाबरोबर शारीरिक विकासही महत्वाचा आहे. त्यादृष्टीने शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष देण्यात आले. बॅडमिंटन, कॅरम, बुध्दिबळ क्रिकेट सारख्या खेळाचे साहित्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. यावर्षी शाळेने लेझीम पथक तयार केले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत असतात. सुविधांच्या बाबतीत शाळा परिपूर्ण आहे. गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा सर्व खर्च शाळा करते. याकामी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांचे सहकार्य लाभते. शाळेची राज्यातील १०० आंतरराष्ट्रीय शाळेमध्येही निवड झाली आहे.

शाळा सिध्दीमध्ये ‘अ’दर्जा प्राप्त झाला आहे. शाळेला आयएसओ नामाकंन मिळाले असून, विज्ञान प्रदर्शनामध्येही विद्यार्थी चमकले आहेत. २०१६ साली मुख्याध्यापकांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलं. कराटे स्पधेर्तील विद्यार्थ्यांनी जिल्हा व राज्य पातळीवर छाप पाडली. ग्रामस्थांच्या सहकायामुळे ४० एलईडी संच कार्यान्वित करण्यात आले. पिण्याचे स्वछ्च पाणी पालकांच्या मदतीमुळे विद्यार्थ्यांना मिळत आहे. शाळेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले असून, त्याचा सांभाळ विद्यार्थी करत आहेत. वाढदिवस, बचत बँक, बियाणे बँक, एकग, विद्यार्थी एक झाड, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, पारस बाग, इंग्रजी परिपाठ असे विविध उपक्रम शाळेत राबविले जातात. याच शाळेतील विद्यार्थी मीनानाथ रघुनाथ गिरमकर २००१ साली कारगिल युध्दात शहिद झाले. याच परिसरात वीरमाता नर्मदा उर्फ नमाआत्या गिरमकर राहतात. हीच प्रेरणा विद्यार्थ्यांच्या समोर सातत्याने असते. सर्वाच्या माध्यमातून अजूनज जिल्हा परिषद शाळा उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाऊ लागली. म्हणून पुढे येत आहे …

शब्दांकन: विशाल चव्हाण, प्रतिनिधी, पुण्यनगरी.. संतोष गोरखे,श्रीगोंदा..

ग्रामस्थ, शिक्षक व सर्वांच्या सहकायामुळे शाळेत नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आलेख कायमच उंचावत आहे. भविष्यात आणखी उपक्रम राबविण्याचा ध्यास आहे.बाळासाहेब अनपट, मुख्याध्यापक

(सदरील माहिती पुस्तक प्रकाशित झालेल्या वेळेची आहे)

स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading