आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी उपाय योजना कराव्यात:रुपेश काळेवाघ..

दिनांक १७ ऑगस्ट,श्रीगोंदा:

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, राज्य व केंद्र शासनाने लॉकडाऊन पर्याय निवडून स्टे ऍट होम व वर्क फ्रॉम होमच्या सूचना दिलेल्या आहेत. या संकल्पनेच्या आधारे शाळा, महाविद्यालय ऑनलाइन यंत्रणेच्या माध्यमांतून सुरू करण्यात आले आहेत. मात्र, यासाठी लागणारे संसाधन सामान्य, गरीब, दलित – आदिवासी विद्यार्थ्यांकडे नसल्याने त्यांना या माध्यमांतून शिक्षण घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यावर शासनाने उपाय योजना कराव्यात म्हणून, श्रीगोंदा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी रुपेश काळेवाघ यांनी नमूद वर्गाला शिक्षणाचा लाभ घेता यावा, यासाठी संसाधनं उपलब्ध करण्याची मागणी आज दिनांक १७ ऑगस्ट रोजी श्रीगोंद्याचे तहसीलदार मॅडम यांना दिलेल्या निवेदनातूून केली आहे.

तहसिलदार श्रीगोंदा यांच्या मार्फत धनंजय मुंडे (मंत्री. सामाजिक विकास, महाराष्ट राज्य) यांना सदरील निवेदन सादर करण्यात आले आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व विशेष करून अनुसूचित जाती – जमातीतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी उपाय योजना करणे व त्या प्रकारच्या साधनांची उपलब्धता करून देणेबाबत राज्य शासनाकडे त्यांनी मागणी केली आहे.

तहशीलदारांना निवेदन सादर करतेवेळी संदीप उमप (तालुकाध्यक्ष), निशांत लोखंडे (राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष), आकाश भोसले व संजय काळे पाटील उपस्थित होते. यावेळी सदर मागणीची पूर्तता करणे हेतू राज्यशासनाकडे स्थानिक प्रशासना मार्फत पत्रव्यवहार करण्याची मागणी निवेदन देणाऱ्यांनी केली आहे.

स्रोत:(रुपेश दत्तात्रय काळेवाघ जिल्हाउपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग अहमदनगर यांनी प्रसिध्दीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading