सामाजिक जडण घडनीत महिलांचे योगदान मोठे:धोंडिबा घोडके.

दिनांक १७ ऑगस्ट(लिंपणगाव,श्रीगोंदा):

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातुन भारतीय संविधानाची निर्मिती केली व बहुजन समाजासह महिलांना आरक्षण मिळवून दिल्यामुळे सामाजिक जडण घडणीत त्यांचे योगदान मोठे आहे. असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे जेष्ठ बौद्धाचार्य धोंडिबा (बाबा) घोडके यांनी केले. ते लिंपणगाव येथे वर्षावास प्रवचनाचे ९ पुष्प गुंफताना बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तुकाराम ओहोळ हे होते.

माता यशोधरा मुळे भगवान गौतम बुद्ध घडले, जिजाऊ मुळे शिवाजी महाराज व शंभूराजे सावित्रीमाई मुळे ज्योतीराव फुले व रमाई मुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर घडले. रमाईने काटकसरीने व कष्टाने संसार केला व बाबासाहेबांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत केली. हे करत असताना रमाईने आपले स्वतःचे ४ अपत्य गमवले व बहुजन समाजाचे नेतृत्व डॉ.आंबेडकर यांना खंबीर साथ दिली. त्याची संर्वांनी जाण ठेववी असेही ते म्हणाले.

यावेळी सतीश ओहोळ, बाबासाहेब ओहोळ, किरण जावळे, सिद्धार्थ ओहोळ, संजय ओहोळ, शिवाजी ओहोळ यांचे सह श्रामणेर बौद्धाचार्य बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजू ओहोळ यांनी केले. तर, आभार सुहास ओहोळ यांनी मांडले.

स्रोत:(सतीश ओहोळ, सर यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading