जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळा, खाजगी शाळा तसेच महाविद्यालय, अंगणवाडया, कोचिंग क्‍लासेस ०३ मेपर्यंत बंद राहणार.

दिनांक ३० एप्रिल,अहमदनगर:

कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणून जिल्‍हयातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणेसाठी जिल्‍हयातील सर्व सरकारी शाळा, खाजगी शाळा तसेच महाविद्यालय व आयुक्‍त, व्‍यवसाय प्रशिक्षण केंद्र यांच्‍या आस्‍थापनेवरील शैक्षणिक संस्‍था, अंगणवाडया, कोचिंग क्‍लासेस दिनांक ०३ मेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी यापूर्वी जिल्‍हयातील सर्व सरकारी शाळा, खाजगी शाळा तसेच महाविद्यालय व आयुक्‍त व्‍यवसाय प्रशिक्षण केंद्र यांच्‍या आस्‍थापनेवरील शैक्षणिक संस्‍था, अंगणवाडया, कोचिंग क्‍लासेस दिनांक ३० एप्रिल २०२० चे मध्‍यरात्री पर्यत लागू करण्‍यात आलेले होते. आहे. मात्र, केंद्र शासनाने लॉकडाऊनचा कालावधी दिनांक ०३ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

कोणतीही व्‍यक्‍ती संस्‍था, संघटना यांनी या आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्‍या कलम 188 नुसार दंडनिय कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे जिल्‍हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading