जिल्‍हयातील  सर्व प्रकारची दारु विक्री दुकाने ३० एप्रिलपर्यत बंद.

दिनांक १४ एप्रिल,अहमदनगर:

कोरोना विषाणूच्‍या पार्श्‍वभूमीवर देशात व महाराष्‍ट्र शासनाने लागू केलेल्‍या लॉक डाऊनचा कालावधी विचारात घेता आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा २००५ व महाराष्‍ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ अन्‍वये जिल्‍हयातील सीएल-२ सीएल-३, सीएल/एफएल/टिओडी ३ अनुज्ञप्‍ती , एफएल १, एफएल २, एफएल ३ एफएल बीअर २ एफएल ४ टिडी १ व एफएलडब्‍ल्‍यू २ इत्‍यादी अनुज्ञप्‍त्‍या सर्व देशी/ विदेशी मद्य विक्री दुकाने ३० एप्रिल २०२० पर्यत बंद ठेवण्‍याचे आदेश जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहे .

जिल्‍हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी कोरोना या विषाणूचा संसर्ग अधिक वाढ होऊ नये म्‍हणून प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून सर्व परमिटरुम व मद्यविक्री दुकाने येथे मद्यप्राशन करणा-या ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेता जिल्‍हयातील सर्व देशी विदेशी मद्य विक्री दुकाने दिनांक १४ एप्रिल २०२० पर्यत बंद ठेवण्‍यासाठी आदेशीत करण्‍यात आले होते. आता ही मुदत ३० एप्रिल पर्यंत वाढविण्यात आली आहे.

कोणतही व्‍यक्‍ती, संस्‍था व संघटनांनी या आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास भारतीय दंड विधान संहिता (४५ ऑफ १८६०) च्‍या कलम १८८ नुसार दंडनिय कायदेशीर कारवाईस व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा २००५ व मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ४३(१) अन्‍वये कारवाईस पात्र राहतील.असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading