दिनांक १५ ऑगस्ट,श्रीगोंदा:
मुव्हमेंट फॉर टीचर्स राईट्स या संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात १५ ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या तोंडाला काळी फीत बांधून, अन्नत्याग या एकदिवसीय आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.संपूर्ण महाराष्ट्रातील प्राध्यापक व शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते. याविषयी मुव्हमेंट फॉर टीचर्स राईट्स संघटनेचे नाशिक विभाग प्रमुख प्रा. नितिन झणझणे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.
प्रा. झणझणे हे प्रसारमाध्यंमांशी बोलताना असे म्हणाले की शासनाने १९ सप्टेंबर २०१९ रोजी शासन निर्णय काढून काही प्राथ.माध्य व ज्युनिअर कॉलेज घोषित केले. परंतु, आणखी काही कॉलेज व शाळा घोषित करणे बाकी आहे. एक प्रकारे या कॉलेज व शाळा यांच्यावर अन्याय केला आहे. या शिक्षकांच्या मनामध्ये अस्वस्थता पसरली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक शिक्षक बेरोजगार झाले आहेत. रोजचे जिवन जगणे सुद्धा मुश्किल झाले आहे. कुटुंब चालविणे अवघड बनत चालले आहे. शासनाने वेळीच अघोषित कॉलेज व शाळा घोषित करून त्यांना प्रचलित नियमानुसार अनुदान मंजूर करून त्यांच्या खात्यावर पगार जमा करावा व अघोषित कॉलेज व शाळा यांना या भयानक जाचातून कायमचे मुक्त करावे.शासनाने सप्टेंबरच्या आत कॉलेज व शाळा घोषित करावे अन्यथा संघटनेच्या वतीने आगामी काळात होणारी आंदोलने तीव्र स्वरूपाची असतील. असेही ते म्हणाले आहेत.
यावेळी संघटनेचे (नाशिक विभाग प्रमुख) प्रा. नितिन झणझणे, (राज्य संघटक) प्रा. राहुल सोनवणे, (राज्य सल्लागार) प्रा. दादासाहेब गिरमकर, (राज्य निरीक्षक) प्रा. पांडुरंग भोपळे, (राज्य प्रसिद्धीप्रमुख) प्रा. राम सोनवणे, प्रा. सचिन आगळे, प्रा. योगेश गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
स्रोत: (प्रा. नितीन झणझणे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
