शिवसेना तालुका प्रमुखावरील टिकांचा खुलासा..

दिनांक २५ ऑगस्ट, श्रीगोंदा:

शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांसमोर तालुक्यातील समविचारी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन, त्यात शिवसेना तालुका प्रमुखावर वेगवेगळे आरोप करण्यात आले होते. यावर तालुका प्रमुख बाळासाहेब दूतारे यांनी खुलासा जाहीर केला आहे.

त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे की, शहरात शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत सेनेच्या विद्यमान प्रमुख कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार केली आहे. त्यात काही तथ्य नसुन, तो फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा खुलासा युवासेना उप शहर प्रमुख जयराज गोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

पत्रकात गोरे यांनी म्हटले आहे की, बैठक घेणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांनी अनेक निवडणुकांमध्ये पक्षाचे धनुष्यबाण खाली ठेवले आहेत. आज रोजी नवे पदाधिकारी वरिष्ठांनी निवडले ते शिवसेना पक्ष प्रमुखांचा आदेश असतांना, शिव संपर्क अभियाना मध्ये भाग घेतला नाही. व तालुकाप्रमुख संपर्क अभियान प्रभावीपणे राबवत आहेत.

नव्या पदाधिकाऱ्यांनी काल बैठक घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांना अभियानात सहभाग घेण्यासाठी तोंडी सांगितले. फोन देखिल केला. परंतु, ते उपस्थित राहिले नाहीत. पक्षापेक्षा कोणी मोठा नाही. मात्र, या गैरहजर राहणाऱ्यांनी यातून पक्षाशी देणे घेणे नसल्याचे दाखवून दिले.

बैठक घेणाऱ्यांनी यापूर्वी पक्ष वाढीसाठी काय केले.? हे त्यांना चांगले माहीत आहे. यातील काहीजण शिवसेनेवर टीका करणाऱ्यांच्या गोटात सामील होऊन, विविध प्रश्नांचे निवेदन देतांना व वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना अनेकांनी पाहिले आहेत. आणि आता ते म्हणतात की, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये यश मिळण्यासाठी आम्हांला जबाबदारी द्या. मग त्यांनी यापूर्वी काय केले आहे.? हे वरिष्ठांना माहीत असल्याने ते त्यांची मागणी मान्य करणार नाहीत. याची आम्हाला खात्री आहे. असे गोरे यांनी प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे.

शिवसेनेमध्ये काही तक्रारी असल्यास संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्याकडे दाद मागायची असते. परंतु, अशा बैठका घेऊन, नव्या पदाधिकाऱ्यांना भीती दाखवण्याचा प्रयत्न सध्या तालुक्यात सुरू आहे. परंतु, नवे पदाधिकारी रोज तालुक्यातील जि.प. गट – गणांमध्ये फिरून तेथील समस्या जाणून घेऊन, वरिष्ठांना अहवाल देत आहेत. असा प्रयत्न बैठक घेणाऱ्यांनी कधी केला होता का.? असा सवाल गोरे यांनी पत्रकात शेवटी केला आहे.

स्रोत:(प्रसिद्धीपत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading