दिनांक २४ ऑगस्ट, श्रीगोंदा:
कुकडी गेट हाऊसवर तालुक्यातील समविचारी शिवसैनिकांची बैठक पार पडली. यात (जिल्हा संपर्कप्रमुख) भाऊ कोरेगावकर, (जिल्हाप्रमुख) शशिकांत गाडे सर, (युवा सेनेचे जिल्हाप्रमुख) विक्रम भाऊ वाकळे इत्यादी वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीसाठी श्रीगोंदा (तालुका संघटक) नंदकुमार ताडे, (उपतालुका प्रमुख) संतोष शिंदे, (युवा सेना तालुका संघटक) नाथा भाऊ पवार, (युवा सेना तालुका उपप्रमुख) शिवाजी दांगडे, चोराचीवाडीचे (उपसरपंच) दादा चव्हाण, अजित दिंडे, खरातवाडीचे (शाखाप्रमुख) ऋषिकेश खरात, लिंपणगावचे मयूर चव्हाण, अनिल हिरडे, अनिल सुपेकर, (उपतालुकाप्रमुख) दादासाहेब ढगे सह तालुक्यातील शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीगोंदा तालुक्यामध्ये शिवसेनेचे तालुकाप्रमुख कुठल्याही पद्धतीने जुन्या व जेष्ट शिवसैनिकांना विश्वासामध्ये घेत नाहीत. निवडीपासून त्यांचा मनमानी कारभार चालू असून, पक्ष व संघटना नियमाप्रमाणे तालुक्यात पदाधिकाऱ्यांची एकही मीटिंग झालेली नाही. याबाबत काही पदाधिकाऱ्यांनी विचारणा केली असता, माझं कुणी काही करू शकत नाही. मी करेल तीच पूर्व दिशा आहे. अशी चुकीची विधान करण्यात आली आहेत.

निवडायचे अधिकार मला आहेत. असेही त्यांचे म्हणणे आहे. पदाधिकारी निवडीबाबत त्यांनी हे खरे करून दाखवले आहे. मागे दोन महिन्यापूर्वी युवा सेनेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या कार्यकर्त्यांना लागलीच युवा सेनेच्या तालुका प्रमुख पदी निवडण्यात आले आहे. या निवडीसाठी तालुक्यातील कोणत्याही शिवसैनिक व युवा सैनिकांची बैठक लावण्यात आली नाही किंवा कोणालाही विचारात घेण्यात आलेले नाही. विद्यमान तालुकाप्रमुख जर, असेच मनमानी वागु लागले.? तर, पक्ष व संघटन वाढवायचे की नाही ? असा सवाल अनेक कालखंडापासून शिवसेनेत सक्रिय असलेल्या जुन्या व जेष्ठ शिवसैनिकांसमोर उपस्थित झाला आहे.
या विषयी शिवसेना (संपर्कप्रमुख) भाऊ कोरेगावकर, (जिल्हाप्रमुख) गाडे सर, युवासेना (जिल्हाप्रमुख) विक्रम वाकळे यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे तालुक्यातील कार्यकर्त्यांचे मत आहे. आगामी सहा – सात महिन्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका लागत आहेत. त्यासाठी वरिष्ठांनी सर्वांना विचारात घेऊन, संघटनेच्या नियमाप्रमाणे पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या पाहिजेत. तसेच, निवड करतांना तालुक्यातील सर्व शिवसैनिक, युवासैनिकांच्या उपस्थितीत श्रीगोंद्यातील दोन्ही मुख्य पदं निवडली पाहिजेत. असा सूर या बैठकीतुन आला.
या विषयावर चर्चा करण्यासाठी शिवसेना व युवासेनेच्या समविचारी पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. वरिष्ठ व निर्णय प्रक्रियेतील नेत्यांनी यामध्ये लक्ष घालतं, ही कार्यकारणी बरखास्त करून, पुन्हा एकदा सर्वांच्या साक्षीने नूतन कार्यकारणी निवड करण्यात यावी. अशी मागणी करीत, वरीष्ठ निश्चित जिल्हा परिषद व पंचायत समितीची यादी तयार करतांना सकारात्मक निर्णय घेतील. अशी अपेक्षा बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. गाव तिथे शाखा निर्मितीबाबत महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले.
या बैठकीत समीर काजी, अनिल हिरडे, शिवाजी धांगड, नाथाभाऊ पवार, दादासाहेब ढगे, मयूर चव्हाण, ऋषिकेश खरात, नंदकुमार ताडे, संतोष शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार खरातवाडीचे (शाखाप्रमुख) ऋषिकेश खरात यांनी मानले व बैठक संपन्न झाली.
स्रोत:(प्रसिद्धीपत्र)
