दिनांक २७ जून,श्रीगोंदा:
अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या रस्त्यासाठी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना मागणी पत्र सादर करण्यात आले. दिनांक २५ जून रोजी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील जनसंपर्क कार्यालय, श्रीगोंदा येथे खासदार साहेबांचे बंधु श्री. ज्ञानेश्वरजी विखे पाटील यांचेकडे घुगलवडगाव एसटी स्टँड ते आढळगाव रस्ता लवकरात लवकर मंजुर होऊन काम होणेबाबत तालुका युवासेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी खासदार साहेबांचे स्वीय सहाय्यक अमोलजी शेलार व त्यांचे सहकारी तसेच, युवासेना तालुका संघटक नाथाभाऊ पवार उपस्थित होते. Statement of Yuvasena to Dr. Sujay Vikhe Patil for repair of Ghugalwadgaon ST stand to Adhalgaon road ..
निवेदनात म्हटले आहे की, आत्तापर्यंतच्या खासदारांनी आमच्या गावच्या विकासाकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे आम्ही व आमचे ग्रामस्थ अनेक विकास कामे व मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलो आहोत.

आपण तरुण, तडफदार व विकास कामांकडे लक्ष देणारे खासदार आहात. घुगलवडगाव एसटी स्टँड ते आढळगाव रस्ता जो आजपर्यंत दुर्लक्षित आहे. हा रस्ता झालेलाच नसुन, रोडची दुरावस्था झालेली आहे. पावसात तर, नागरीकांचे जाण्यायेण्याचे खुप हाल होत आहेत. हा रस्ता झाल्यास, नागरीकांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे.
यात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्राधान्याने लक्ष घालून, अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेला रस्त्याचा प्रश्न सोडवावा व नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावी. या मागणीचे निवेदन युवासेना तालुका संघटक नाथाभाऊ पवार यांनी खा. डॉ. विखे पाटील यांना सादर केले आहे.
स्रोत:(प्रसिद्धीपत्र)

