श्रीगोंदयात लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी..

दिनांक २७ जून, श्रीगोंदा:

छत्रपती, राजर्षी, शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत दिनांक २६ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने लोकशाहीर आण्णा भाऊ साठे चौकात लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून वंदन करण्यात आले.

२६ जून हा दिवस राजर्षी शाहू महाराजांचा जन्म दिवस असतो. महाराष्ट्रात तो दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला गेला.

शाहू महाराजांना जातिभेद निवारण, अस्पृश्यता निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जाते. असे विचार उपस्थितांनी नमूद केले. Anniversary celebration of Lokaraja Rajarshi Shahu Maharaj in Shrigonda ..

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागचे (तालुकाध्यक्ष) संदिप उमाप, (नगरसेवक) निसार बेपारी, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागचे तालुका (कार्याध्यक्ष) गोरख घोडके, (शहर कार्याध्यक्ष) जितेंद्र पाटोळे, तालुका (सचिव) शैलेंद्र सांगळे, अविनाश घोडके, भरत काळे, सोनू ससाणे, गणेश ताडे, ज्योतिबा लोखंडे, प्रदीप राऊत तसेच आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धीपत्र)

https://bit.ly/bspmycityshrigonda

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading