दिनांक १८ जुलै २०२४, श्रीगोंदा:
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी (श्रीगोंदा उप तालुकाप्रमुख) चंद्रकांत भाऊ धोत्रे यांनी हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शांचा सन्मान राखत समाजसेवेचे व्रत स्वीकारले आहे. समाजसेवेच्या तळमळीने प्रेरित होऊन त्यांनी आज श्रीगोंदा शहरांमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला श्रीगोंदा नगरीचे माजी नगराध्यक्ष मनोहर दादा पोटे, संतोष क्षिरसागर, सुनील वाळके, शिवसेना उबाठा पक्षाचे उप जिल्हाप्रमुख बाळासाहेब दुतारे, सुरेश बाबा देशमुख, योगेश भुतकर, हरिभाऊ काळे सह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रकांत भाऊ धोत्रे यांनी लोकाभिमुख आणि रुग्णांना उपयोगी पडणारे हे कार्य हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन केले आहे. शिवसैनिकांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या ध्येयधोरणाने कार्य करावे, हा बाळासाहेबांचा संदेश धोत्रे यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिला आहे. रुग्णांच्या भावना आणि गरजा लक्षात घेता त्यांनी ही रुग्णवाहिका शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिली आहे.
या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या बाळासाहेब दुतारे, मनोहर दादा पोटे, सुनील वाळके, संतोष क्षिरसागर यांनी चंद्रकांत धोत्रे यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच, भविष्यात देखील समाजसेवेसाठी असेच कार्य करत राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन संत शेख महंमद बाबा यांच्या प्रांगणामध्ये उत्तम प्रकारे झाले आणि श्रीगोंदा शहरातील नागरिकांनी या सेवेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
स्रोत:(आयोजित कार्यक्रम)






