श्रीगोंदा भैरवनाथ देवस्थानच्या सभामंडप व सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्री निधीतून २५ लक्ष रुपये मंजूर..

दिनांक १८ जुलै २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील भैरवनाथ देवस्थानच्या समोरील सभामंडप व सुशोभीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या मुख्यमंत्री निधीतून २५ लक्ष रुपये मंजूर झाले. या कामाचं भूमिपूजन युवा नेते, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री विक्रमसिंह बबनरावजी पाचपुते यांच्या हस्ते आज करण्यात आले. या प्रसंगी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, भाजपा नगरसेवक तसेच देवस्थान समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाला युवा सेना शहर प्रमुख संदीप भोईटे, यात्रा कमिटी अध्यक्ष आमले पाटील व सर्व सदस्य, नगरसेवक प्रशांत गोरे, संतोष कोथिंबीर, निसार बेपारी, समीर बोरा, अशोक खांडके, बापू तात्या गोरे, रमेश लाढाने, संग्राम घोडके, उपनगराध्यक्ष पती सुधीर खेडकर, सोनाली हृदय घोडके, मनीषाताई लांडे, सहा. पोलीस उप निरीक्षक अंकुश ढवळे मेजर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष शिंदे, जिल्हा संघटक रघु शिंदे, तालुका प्रमुख नंदू ताडे, शहर प्रमुख नितीन गायकवाड, संघटक गणेश गांजुरे, पांडू गांजुरे, नंदकुमार लाढाने, मनोज गजरमल, विलास नन्नवरे, धनंजय कोथिंबीरे, विकास बोरुडे, राजेंद्र चव्हाण, भाऊसाहेब सिदनकर, सुभाष शेठ मुनोत, सखाराम गांजुरे, चंद्रकांत वडवकर, गोरक सिनलकर, नाना लांडे, अमोल ढवळे, अनिल औटी, वैभव चोर, उमेश वेताळ व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी प्रशांत गोरे, नंदू ताडे व रमेश लाढाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आमदार बबनराव पाचपुते सह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थित सर्वानुमते आभार व्यक्त केले.

स्रोत:(आयोजित कार्यक्रम)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading