श्रीगोंदा नगरपरिषदेला १० कोटींचा विशेष निधी मंजूर.. आमदार बबनराव पाचपुते यांचे आभार..

दिनांक ४ सप्टेंबर २०२४,श्रीगोंदा:

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने श्रीगोंदा नगरपरिषदेसाठी १० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. हा निधी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी “वैशिष्ट्यपूर्ण” योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला असून, त्याचा वापर शहरातील विविध विकासकामांसाठी करण्यात येणार आहे.

दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, नगरपरिषदांना विशेष अनुदान देण्याच्या या योजनेअंतर्गत श्रीगोंदा नगरपरिषदेसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीचा वापर करावयाच्या कामांची यादी शासन निर्णयासोबत जोडण्यात आली आहे. त्यामुळे नगरपरिषदेकडून लवकरच या निधीचा उपयोग करून शहराच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत.

श्रीगोंदा शहरातील नगरपालिका हद्दीत विविध विकासकामे पार पाडण्यासाठी हा निधी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक सातमध्ये या निधीच्या सहाय्याने महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या निधीच्या मंजुरीसाठी आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नांचे विशेष योगदान असल्याचे संग्राम घोडके यांनी सांगितले. नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत करत आमदार बबनराव पाचपुते यांचे आभार मानले आहेत.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading