व्यंकटेश पोदार लर्न स्कुलचा आषाढी वारी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न..

दिनांक १८ जुलै २०२४,श्रीगोंदा:

दिनांक १७ जुलै २०२४ रोजी व्यंकटेश पोदार लर्न स्कुलचा आषाढी वारी दिंडी सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात श्रीगोंदा शहरातील बगाडे कॉर्नर (जोधपूर मारुती चौक) या ठिकाणाहून झाली. यावेळी विठ्ठल रुख्मिनी आणि श्रीगोंदा भूमीतील शेख महंमद महाराज यांच्या प्रतिमा व पादुका पूजन करण्यात आले.

पूजेसाठी उपस्थित मान्यवरांमध्ये श्री. गोपाळराव मोटे पाटील, श्री. बंडुकाक दहातोंडे, संस्थेचे चेअरमन श्री. नवनीत मुनोत, व्हा. चेअरमन श्री. अतुल बगाडे, आणि प्राचार्य श्री. जितेंद्र वाघमारे सर यांचा समावेश होता. त्यांच्या हस्ते विधिवत पूजा झाल्यानंतर दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला.

श्रीगोंदा शहराच्या सर्व प्रमुख रस्त्यांवरून दिंडी प्रदक्षिणा करण्यात आली. बगाडे कॉर्नर पासून मांडवगण वेस, कासार गल्ली, झेंडा चौक, रोकडोबा चौक, काळकाई चौक, आणि होनराव चौकातून शनी चौक मार्गे महंमद बाबा प्रांगणामध्ये दिंडी पोहोचली आणि शहर प्रदक्षिणा पूर्ण झाली.

प्रत्येक चौकामध्ये विद्यार्थ्यांनी विविध वारकरी वेशभूषेमध्ये नृत्य, अभंग आणि लेझीम सादर केले. शालेय व्यवस्थापनाच्या वतीने सर्व विद्यार्थी, पालक वर्ग, आणि इतर भाविकांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व विश्वस्त, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि पालक यांनी अनमोल सहकार्य केले. महंमद बाबा प्रांगणामध्ये आषाढी वारी निमित्त विविध अभंगवाणी विद्यार्थ्यांनी सादर केली. ७ वीच्या विद्यार्थ्यांनी संत गोरा कुंभार यांच्या जीवनपटावरील विठ्ठल भक्तिमय प्रसंगाचे नाट्यमय सादरीकरण केले.

चेअरमन श्री. नवनीत मुनोत यांनी आपल्या भाषणामध्ये संतांचे महत्व विशद केले आणि सर्वांचे आभार मानले. शेवटी फराळ/प्रसाद ग्रहणानंतर दिंडी सोहळ्याची दिमाखात सांगता झाली.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading