दौलत (नाना) शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप..

दिनांक १७ जुलै २०२४, श्रीगोंदा:

जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत (नाना) शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात तालुकाध्यक्ष संदीप भोईटे यांच्या पुढाकाराने रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी संदीप भोईटे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने केलेल्या सामाजिक कार्याबद्दल मित्रांसह पदाधिकाऱ्यांनी उपक्रमाचे स्वागत केले आहे. तसेच, राष्ट्रीय अध्यक्ष दौलत (नाना) शितोळे यांना सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

या उपक्रमामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष व युवा सेना शहर प्रमुख श्री संदीप भोईटे यांनी शितोळे नाना यांच्या वाढदिवसा बाबत केलेल्या सामाजिक उपक्रमांबाबत माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिल्या. दौलत (नाना) शितोळे यांच्या सामाजिक कार्याचा ओहापोह करीत, त्यांनी केलेल्या सतकार्याची माहिती उपस्थित सहकाऱ्यांसमोर व्यक्त केली.

यावेळी सहा. पोलीस उपनिरीक्षक अंकुश ढवळे, तालुकाध्यक्ष संदीप भोईटे, सरपंच व शिवसेना पदाधिकारी संतोष शिंदे, शिवसेनेचे गणेश गांजुरे, नितीन गायकवाड, मनोज गजरमल, अनिल औटी, विपुल देवखिळे, अमोल ढवळे, रमेश थोरात, अविनाश घोडके, देविदास देवरे, संपत खराडे, वैभव चोर व अक्षय पिंपळे सह जय मल्हार क्रांती संघटना व शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्रोत:(आयोजीत कार्यक्रम)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading