गडकरींच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन.. श्रीगोंदयाचाही समावेश..!

दिनांक २ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथे झालेला लोकार्पण सोहळ्यात सुमारे ४०७५ कोटी किंमतीच्या सहा प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. तर, पाच रस्त्यांचा लोकापर्ण सोहळा पार पडलाय.

तळेगाव, चाकण, शिक्रापूर, नावरा, श्रीगोंदा, जामखेड आणि पाटोदा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८, जामखेड ते सौताडा या रस्त्याचं १३५ कोटीचं काम तसेच, जामखेड शहरातून जाणारा जामखेड ते बीड जोडणारा महत्त्वाचा मार्ग अॅन्यूअल प्लॅनमध्ये मंजूर करत असल्याचे त्यांनी सांगितले.

तळेगाव, चाकण, शिक्रापूर, नाव्हरा, श्रीगोंदा, जामखेड आणि पाटोदा हा दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर, निम्मन गाव येथे रेल्वे उड्डाण पुलाचं काम मी मंजूर करत असून, हे काम लवकर सुरू होईल असे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. Bhumipujan of development works at the hands of Gadkari .. Shrigonda is also included ..!

कोपरगाव ते सावळी विहीर हे मालेगाव – मनमाड – अहमदनगर हा दक्षिण व उत्तरेला जोडणारा अवजड वाहनांचा रस्ता हा शिर्डीला जोडणारा रस्ता आहे. त्याचंही काम मी मंजूर करत आहे. त्यासाठी १५० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, अशी घोषणा याप्रसंगी गडकरी यांनी केली.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading