अनं.. आमदार पाचपुते त्या अधिकाऱ्यांवर भडकले..! ही काय खाजगी मालमत्ता आहे काय.? विधानसभेत हक्कभंग आणणार..

दिनांक २ ऑक्टोंबर, श्रीगोंदा:

काय म्हणाले बबनराव पाचपुते.?: काय प्रोटोकॉल पाळला तुम्ही.? चाळीस वर्ष राजकारनात आहोत.. सात वेळा आमदार झालो आहे. यांचे काम नाही.. अधिकाऱ्यांचे काम आहे हे.! स्थानिक आमदार असतांना नाव खाली टाकता. हे बरोबर नाही. कोविड संक्रमण सुरु झाल्यानंतर सर्वात प्रथम आपण विकास निधीतून पन्नास लाख रुपये दिले आहेत. तसेच, नमूद प्लांटसाठी ३७ लाख रुपये दिले आहेत. प्रोटोकॉल प्रमाणे नाव टाकायला पाहिजेत. ही काय खाजगी मालमत्ता आहे काय.? विधानसभेत हक्कभंग आणणार..!

स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लँट व विस्तारीत कोव्हिड इमारतीच्या उदघाटन प्रसंगी बोलतांना आमदार बबनराव पाचपुते यांनी शिष्टाचार न पाळणाऱ्या अधिकाऱ्यां विरोधात विधानसभेत हक्कभंग दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. संतप्त होण्यामागे कारणही तसेच घडले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज दिनांक २ ऑक्टोबर रोजी श्रीगोंद्यातील ग्रामीण रुग्णालयात स्वतः आमदार बबनराव पाचपुते यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लँट व कोव्हिड इमारतीचे उदघाटन (पालकमंत्री) हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाले. मात्र, या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत बबनराव पाचपुते (आमदार) यांचे नाव खाली टाकण्यात आले होते. त्यामुळे कार्यक्रमादरम्यान बबनराव पाचपुते यांनी अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. मनमानी पद्धतीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांना शिष्टाचार समजायला हवा. लवकरच या अधिकार्‍यांवर विधानसभेत हक्कभंग दाखल करणार असल्याचे, आमदार पाचपुते यांनी सांगितले. And .. MLA Pachpute got angry with those officials ..! What is this private property? Will bring violation of rights in the assembly ..

नमूद उद्घाटन सोहळ्यास (जिल्हाधिकारी) डॉ. राजेंद्र भोसले, (जिल्हा शल्य चिकित्सक) डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading