ग्रामीण रुग्णालयात प्रसूती कक्ष व इतर सुविधा उपलब्ध कराव्यात.. पालकमंत्री मुश्रीफ यांना उमाप यांचे निवेदन..

दिनांक ३ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

शहरातील ग्रामीण रुग्णालयात प्रसूती कक्ष व इतर सोयीसुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात यसाठी मा. ना. हसनजी मुश्रीफ साहेब (ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य) यांना राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदिप उमाप यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

निवेदनात उमाप यांनी नमूद केले आहे की, तालुक्यात साधारणपणे ११७ गावे असून, लोकसंख्या सुमारे ३ लक्ष पेक्षा जास्त आहे. ग्रामीण रुग्णालय सर्व सोयींनी सुसज्ज असे सरकारी हॉस्पिटल सद्यस्थितीत चालू नसल्याने, तालुक्यातील लोकांच्या आरोग्याच्या सुविधा नसल्याने फार मोठी अडचण होत आहे. त्यामुळे मोठमोठ्या शहरामध्ये रुग्णांना धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे मोठया आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

त्यातच महिलांच्या आरोग्याच्या सुविधांचा देखील अभाव आहे. तालुक्यातील गरोदर महिलांच्या दृष्टीने त्यांची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. परंतु, ग्रामीण रुग्णालयात सद्यस्थितीत प्रसूती कक्ष कार्यान्वित नाही. अनेक सोइ सुविधांचा प्रचंड प्रमाणात तुटवडा आहे. तसेच, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, भुलतज्ञ डॉक्टर हे ग्रामीण रुग्णालयात नसल्याने त्याचप्रमाणे गरोदर महिलांना प्रसूतीसाठी अगर सिझेरियन करणेसाठी डॉक्टर नसल्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. Maternity ward and other facilities should be provided in rural hospitals .. Statement of Umap to Guardian Minister Mushrif ..

कोविड-१९ मुळे अनेक लोकांचे कुटुंब उध्वस्त झालेले आहे. गोरगरीबाच्या हातातील काम बंद होत आहे व बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तरी, ना. हसन मुश्रीफ साहेबाना श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात तातडीने प्रसूतीकक्ष कार्यन्वित करावा,सदर ठिकणी कुटुंब शस्त्रक्रियेचा कार्यक्रम देखील सुरू करावा व इतर सोयीसुविधा पुरवण्यात याव्यात. असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदिप उमाप यांनी दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे (तालुका कार्याध्यक्ष) गोरख घोडके, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे (जिल्हा उपाध्यक्ष) रुपेश काळेवाघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (तालुकाध्यक्ष) ऋषिकेश गायकवाड, ओबीसी सेलचे (तालुकाध्यक्ष) सागर वाकडे, राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल (तालुकाध्यक्ष) शाम जरे, अल्पसंख्याक (तालुकाध्यक्ष) अजिम जकाते, जितेंद्र पाटोळे, निशांत लोखंडे, मयूर क्षीरसागर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

स्रोत:(निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading