सभासद/कामगारांची दिवाळी गोड करणार.. :राजेंद्र नागवडे..

दिनांक २ ऑक्टोबर,श्रीगोंदा:

सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा ४७ व्या गाळप हंगामाचा बाॅयलर अग्नि प्रदीपन समारंभ काल दिनांक १ ऑक्टोबर रोजी कारखाना सभासद, शेतकरी, कर्मचारी व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. हभप पुंडलिक महाराज जंगले (शास्त्री) यांचे हस्ते पूजापाठ करण्यात आला. यावेळी कारखान्याचे चेरमन राजेंद्र नागवडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष अविनाश निंभोरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलतांना राजेंद्र नागवडे म्हणाले की, मागील गाळप हंगामासाठी संगमनेर संजीवनी यांनी २ हजार ५०० रू भाव दिला. नागवडे साखर कारखाना जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा ऊसाला भाव देणार आहे आणि सभासद/कामगारांची दिवाळी गोड करणार आहे. अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.

नागवडे पुढे म्हणाले की, या गाळप हंगामासाठी नऊ लाख मे. टन ऊसाचे गाळप करणायाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तेंव्हा शेतकऱ्यांनी आपल्या नागवडे साखर कारखान्यास प्राधान्याने द्यावे. ऊस घालतांना घाई करू नये. साखरेच्या भावात सारखा चढ उतार होतो. जुनी साखर कमी भावाने विकावी लागते. लवकरच इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे काम हाती घ्यावे लागणार आहे. असे ते म्हणाले.

बाबासाहेब भोस म्हणाले की, नागवडे साखर कारखाना भविष्यात सक्षमपणे चालण्यासाठी राजकिय जोडे बाजुला ठेवून कारखान्याकडे पाहावे लागेल.

कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशवराव मगर म्हणाले कि, नागवडे साखर कारखान्याला ऊस घालणे आवश्यक आहे. तरच, ऊसाला चांगला भाव देता येईल.

यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे कुकडी पाट पाणी कृती समितीचे समन्वयक राजेंद्र म्हस्के यांचीही भाषणे झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाषराव शिंदे यांनी केले. यावेळी जिल्हा बॅकेच्या (संचालिका) अनुराधा नागवडे, (नगराध्यक्षा) शुभांगी पोटे, बाबासाहेब इथापे, आण्णासाहेब शेलार, जिजाबापू शिंदे, प्रेमराज भोयटे, प्रशांत गोरे, योगेश भोयटे, बाळासाहेब दूतारे आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांचे आभार शरद खोमणे यांनी मानले.

स्रोत:(आयोजित कार्यक्रम)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading