श्रीगोंदा…लोखंडे बापूंच्या स्मृतिदिनानिमित्त सिद्धार्थनगर शाळेला एक्वा वॉटर फिल्टर भेट…

दिनांक २५ मार्च (श्रीगोंदा):

लोखंडे बापूंची शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी व तालुक्यातील विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनातून एक सक्षम पिढी घडली. त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेत, आज सिद्धार्थनगर येथील जिल्हा परिषदच्या शाळेला बापूंच्या स्मृतिदिनानिमित्त नातेवाईक (मुलगी व जावई) यांच्याकडून एक्वा वॉटर फिल्टर मशीन भेट देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी बापूंची कारकीर्द आणि त्यांचा जीवन संघर्ष यावेळी नमूद केला. हृदय घोडके व संग्राम घोडके यांच्या विशेष प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

सिद्धार्थ नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात घेण्यात आलेल्या लोखंडे (बापुं)च्या तृतीय स्मृतिदिन कार्यक्रमांत उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये उपस्थितांना बापूंच्या जीवन संघर्षांची माहिती दिली. बापूंच्या मुली व जावयाने सिद्धार्थनगर शाळेची निवड करून, येथील वंचित व उपेक्षित मुलांना स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने वॉटर फिल्टर मशीन भेट दिली. या भेटीबद्दल पालक व उपस्थित मान्यवरांच्या वतीने भोस यांनी सोनवणे कुटुंबाचे आभार मानले.

https://bit.ly/bspmycityshrigonda

यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलतांना बाबासाहेब भोस म्हणाले की, लोखंडे (बापू) यांनी श्रीगोंदा शहरातील रयत शिक्षण संकुलाच्या महादजी शिंदे विद्यालयात यशस्वी कार्यकिर्द राबवली. मुख्याध्यापक पदावर कार्यरत असतांना त्यांनी विद्यालयामध्ये शिस्त आणि अनुशासन आबादित ठेवले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या ऑडिटर या पदावरही कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात कोणतेही गैरकृत्य झाले नाही. प्रामाणिकपणाने त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले. संत शेख महंमद बाबा(महाराज) यांच्या यात्रेच्या दिवशीच लोखंडे बापूंचा स्मृतिदिन असणे हा मोठा दुर्मीळ योगायोग असल्याबाबत बाबासाहेब भोस यांनी नमूद केले. सिद्धार्थनगर शाळेतील विद्यार्थ्यांना इतरांप्रमाणे शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे. या प्रामाणिक हेतूने बापूंच्या संबंधितांनी एक्वा वॉटर फिल्टर शाळेला भेट दिला. याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

त्यांच्या भेटीविना एक दिवसही गेला नाही. बापू हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. चिरेबंदी चिऱ्याप्रमाणे कोणत्याही भूमिकेस सामोरे जाण्याची कला असलेले व्यक्तिमत्व म्हणजे बापू होय. रयत शिक्षण संस्थेमध्ये उत्कृष्ट पद्धतीने ज्ञानदानाचे काम केले. तत्कालीन महादजी शिंदे विद्यालयाची शैक्षणिक उंची वाढवण्याचा प्रयत्न बापूंनी केला. कोणाच्याही शिफारशी विना बापूंच्या कामाची दखल घेत, रयत शिक्षण संस्थेने त्यांना ऑडिटर या महत्त्वाच्या पदावर नेमले होते. त्या कालखंडात बापूंसारख्या कर्तृत्ववान माणसांमुळे रयत आणखीनच सशक्त झाली. हाडाचा रयत सेवक म्हणून त्यांनी संस्थेत काम केले. मनापासून काम करणाऱ्यां या शिक्षकाच्या रिटायरमेंटनंतर रयतमध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण झाल्याचे भोस यांनी सांगितले. श्रीगोंद्याच्या सामाजिक जडणघडणीमध्ये लोखंडे (बापुंचे) मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. संत शेख महंमद बाबा यांच्या योगसंग्राम ग्रंथांचे सर्व महत्त्वाचे काम बापूंनी पार पाडले. बापूंच्या आचार, विचारांमुळे ते आजही आपल्यामध्ये जिवंत असल्याचे भासत आहे. बापूंच्या महान विचारांप्रमाणे इतरांनी कार्य करावे. अशी अपेक्षा भोस यांनी बोलतांना व्यक्त केली. येथील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करता, येथे एक प्रशस्त विद्यालय निर्माण करण्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या शैक्षणिक विभागांतून निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्य शिक्षिका शेळके मॅडम व मुख्याध्यापक मोटे सर यांनी केले. तर, उपस्थित मान्यवर, रयत सेवक व कुटुंबातील सदस्यांच्या हस्ते एक्वा वॉटर फिल्टर मशीनचे लोकार्पण करण्यात आले.

Shrigonda … Aqua water filter machine gift to Siddharthnagar school on the occasion of Memorial Day ..

या कार्यक्रमासाठी जनता महाविद्यालय काष्टीचे मुख्याध्यापक राठोड सर, भोकरे सर, प्रशांत गोरे, राजू दादा गोरे, अक्तार भाई शेख, हृदय घोडके, (नगरसेवक) संग्राम घोडके, संतोष क्षिरसागर, बापूशेठ गोरे, जिवाजी घोडके, गोरख तात्या घोडके, अविनाश मल्हाराव घोडके, शिवाजी (आप्पा)घोडके, अविनाश आकाश घोडके, राजे जगताप, अशोक खेंडके, राजेंद्र राऊत, (प्राध्यापक) बाळासाहेब बळे, (पत्रकार) भंडारे पुणे, (गटशिक्षण अधिकारी) गुलाब सय्यद, (शिक्षणाधिकारी) गजानन ढवळे, लक्ष्मण घोडके, अभिमान सोनवणे सर, खेडकर सर, जानराव सर, शेळके सर, कदम सर, रावसाहेब घोडके, नानासाहेब कोथिंबिरे, धोंडीबा घोडके, (महादजी शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक) बोडके सर, (नगरसेवक) संतोष कोथिंबिरे सह बापू लोखंडे यांच्या कुटुंबातील सदस्य व पालक उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थितांचे आभार प्रदर्शन श्रीगोंदा नगरपालिकेचे नगरसेवक तथा बांधकाम समितीचे सभापती संग्राम घोडके या यांनी केले.

स्रोत:(डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे आयोजित कार्यक्रम)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading