दिनांक १४ डिसेंबर २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा प्रहार दिव्यांग संघटनेने सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका घेत एक महत्त्वाचा उपक्रम राबवला. आज संघटनेच्या वतीने श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाला रुग्णांच्या सेवेसाठी मोफत व्हीलचेअर प्रदान करण्यात आली. या उपक्रमामुळे दिव्यांग व गरजू रुग्णांना लाभ होणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात संघटनेचे प्रमुख सदस्य व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हीलचेअर रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमात संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते श्री. राजेंद्र पोकळे, सुरेश गलांडे, डॉ. सोमनाथ देवकाते, समीर खान, रामफळे, शशिकांत आंधळकर, सचिन तोडकर, गणेश कळसकर, रामभाऊ पाचपुते, रवींद्र मस्के, उत्तम धारकर, वराडे, नवनाथ नलगे, वैभव हराळ, अमोल शाम आणि प्रताप आल्हाट यांची विशेष उपस्थिती होती.

श्रीगोंदा प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने रुग्णसेवा व सामाजिक बांधिलकी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी संघटनेच्या सदस्यांनी सांगितले की, “दिव्यांग व रुग्णांसाठी अशा प्रकारच्या सुविधांची नितांत गरज आहे. या उपक्रमाने रुग्णांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारात सोयीस्कर सेवा मिळेल.”

स्रोत: (प्रसिद्धी पत्र)

