दिनांक ८ डिसेंबर, श्रीगोंदा:
मागील तीन महिन्यापासून खांडगाव/वडघूल या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक हजर होत नाहीत. ही बाब वेळोवेळी विस्तार अधिकारी कैलास जगताप, गटविकास अधिकारी शेलार यांच्या निदर्शनास आणूनही दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.
त्याबद्दल खांडगाव ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात ग्रामस्थ संतोष वाडगे आणि त्यांचे सहकारी मित्र यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. साहेब मृत्यूचा दाखला भेटत नाही. त्यामुळे शासनाने कोरोना संदर्भात जो GR जाहीर केलायं त्याचा लाभ घेता येईना.. रोज ग्रामपंचायत ऑफिस मध्ये गेलो की, ग्रामसेवक आज येईल, उद्या येईल, परंतु ग्रामसेवक खांडगाव मध्ये येण्याच्या सर्व आशा मावळल्या आहेत.
सरपंच पती कारभारी ढवळे यांना कॉल केला की, सरपंच मंगल कारभारी ढवळे या त्यांच्या शेतात भावडी येथे काम करत आहेत असे सांगतात. त्यामुळे कोणाला कॉल करावा आणि कोणाकडून कामे होतील.? हे आम्हाला समजून येत नाही.
ग्रामसेवक हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मधला दुवा असतो ग्रामसेवक नसेल तर, गावच्या विकासाची सर्व कामे ठप्प होतात. याची कल्पना असून सुद्धा आपण आमच्या गावात ग्रामसेवक देत नाही ही मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. असे त्यांनी नमूद केले आहे. १४ वित्त आयोग, १५ वित्त आयोग, हा निधी अखर्चित आहे. गावात कुठलीही विकास कामाला चालना मिळत नाही. दलित निधी मंजूर होऊन, ग्रामसेवक नसल्यामुळे काम होत नाहीत.
खांडगाव येथे पाण्याची मोठी समस्या उद्भवली त्याचं निराकरण कोण करणार.? वैयक्तिक लाभ जनावरांसाठी गोठे, शेळी शेड, विहीर बांधकाम घरकुलांचा प्रश्न, मागासवर्गीय सेस फंड, अपंग निधी तसेच घरपट्टी, पाणीपट्टी, जागेचा उतारा, रहिवाशी दाखला, शौचालय प्रस्ताव हा सर्व ग्रामपंचायतीचा कारभार कोण सोडणार.? हे अद्याप पर्यंत अनुत्तरित आहे. गेल्या तीन महिन्यापासून सामान्य माणसाचा कुठलाच प्रश्न सुटलेला नाही आणि खेदाची गोष्ट म्हणजे, वडघूल आणि खांडगाव मध्ये साधे शौचालय सुद्धा मंजुर झालेले नाहीत. हि खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. प्रशासनाने याची वेळीच दखल घ्यावी, अन्यथा.. पीडित ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत. असे ते म्हणाले.
सामान्य ग्रामस्थांच्या आशा मावळल्या आहेत.. त्यात गाई गुरांसाठी निवारा व्हावा म्हणून, आम्ही काही पहिले प्रस्ताव दिलेले आहेत. त्यात सुद्धा कारण नसताना त्रुटी काढून, ते प्रस्ताव माघारी पाठवण्यात आलेले आहेत. त्रुटी काढलेले प्रस्ताव फेर सादर केले तरी, पुन्हा ते प्रस्ताव होतील की नाही. याची खात्री नाही. फक्त सरपंच पती कारभारी (काका) ढवळे यांच्याकडूनच आलेले प्रस्ताव कसे मंजूर का होतात ? आणि आमचे प्रस्ताव कसे लांब जातात किंवा त्यात त्रुटी का काढले जातात.? याचं गणित सामान्य माणसांना समजेनासं झालंय.असे त्यांचे मत आहे.
गटविकास अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. अन्यथा, दुर्लक्षित ग्रामस्थ आपल्या कार्यलयासमोर आंदोलन करून, BDO च्या ऑफिसला कुलूप लावतील.. असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)
