दिनांक १४ एप्रिल(मढेवडगाव,श्रीगोंदा):
तालुक्यातील मढेवडगाव येथील देवस्थान काळ भैरवनाथ यात्रा उत्सव,कोरोना महामारीने राज्यात लागू असलेल्या जमावबंदी कलम १४४ आदेशामुळे यात्रा कमिटीने रद्द केला आहे.
दिनांक १६ व १७ रोजी होणाऱ्या मढेवडगावची यात्रा देवस्थान काळभैरवनाथ महाराजांच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून भाविक हजेरी लावीत असतात. परंतु कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर शासकीय आदेश व सूचनांचे पालन करत यात्रा कमिटी व ग्राम पंचायतने सालाबादप्रमाणे होणारा यात्रा उत्सव रद्द् करण्याचा निर्णय घेतला आहे.
या यात्रा उत्सवादरम्यान अभिषेक,दंडवत,देवाचे गाडे ओढणे, छबिना, करमणुकीचे कार्यक्रम व हगामा इत्यादी सर्व प्रकारचे कार्यक्रम होणार नाहीत.तसेच, भाविकांनी मंदिर परिसरात फिरू नये, गर्दी करू नये अशी विनंती यात्रा कमिटी, सरपंच महानंदा मांडे, उपसरपंच कल्याणी गाढवे व ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
