सुफी संत शेख महंमद बाबा यांचा ४०७ वा संदल-उरुस यात्रा उत्सव… विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..

दिनांक ३ मार्च २०२५, श्रीगोंदा:

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमंत मालोजी राजे भोसले यांचे गुरू आणि सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या सुफी संत शेख महंमद बाबा यांचा ४०७ वा संदल-उरूस (यात्रा) उत्सव दि. १० मार्च २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शेख महंमद बाबा ट्रस्टचे अध्यक्ष आमीनभाई शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पारंपरिक परंपरेने होणार यात्रा उत्सव..

या संदल-उरूस यात्रा उत्सवात हिंदू-मुस्लिम भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलीस प्रशासनाच्या वतीने मानाची चादर संत शेख महंमद बाबा यांच्या कबरीवर चढवण्यात येणार आहे. भाविक मोठ्या भक्तिभावाने चादर, शेरणी, नवस फेडण्याचे साहित्य अर्पण करतात. श्रीगोंदा आणि राज्यभरातील हजारो भक्त या पवित्र यात्रेसाठी हजेरी लावणार आहेत.

४०७ व्या संदल-उरूस यात्रेनिमित्त दि. ७ मार्चपासून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे –

  • दि. ७ मार्च – कुरान पठण (कुरान खाणी)
  • दि. ८ मार्च – रात्री ९:३० वा. सुप्रसिद्ध कव्वाल सिराज चिश्ती (गुजरात) यांचा जंगी कव्वाली (भक्तिगीत) कार्यक्रम, तसेच रात्री ११ वा. संदल (चंदन), गुस्लखानी, चिराग-ए-रोशन, महाप्रसाद
  • दि. ९ मार्च – सायंकाळी लंगरखाना, महाप्रसाद, मिलाद शरिफ (प्रवचन) व बाबांच्या कार्याची माहिती
  • दि. १० मार्च – मुख्य उरूस (यात्रा) – भाविक भक्त बाबांच्या कबरीवर फुलांची व कापडी गलफ चादर, मलिदा, गूळ, पेढा, नारळ, प्रसाद अर्पण करतील
  • दि. ११ मार्च – दुपारी २ वा. कुस्त्यांचा जंगी आखाडा

शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांनी या पवित्र उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पत्रकार परिषद..

या पत्रकार परिषदेला ट्रस्टचे बंडूभाई शेख, अल्लीभाई शेख, राजुभाई शेख, अजीजभाई शेख, राजूभाई शेख, चांदभाई शेख, शाहरुख शेख, तौसिफ शेख, सोहेल शेख, रेहान शेख, अरमान शेख, सुफियान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

स्रोत:(पत्रकार परिषद)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading